बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त!

नवी दिल्ली | सोन्याच्या भावात वारंवार चढ-उतार पहायला मिळत असतात. अशातच आज सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली सराफ बाजारात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी घसरुन प्रति 10 ग्रॅम 46145 रुपयांवर गेला आहे.

जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमत प्रति औंस 0.4 टक्यांनी घसरुन 1,769.03 डॉलर झाली.  या घसरणाऱ्या किंमतीमुळे सोनं आणखी स्वस्त झालं आहे. भविष्यातही सोन्याच्या किंमती आणखी कमी होऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा आजचा भाव हा 1 टक्क्याने घसरला असून 68 हजार 479 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. तसंच जागतिक बाजारात चांदी 1.1 टक्क्यांनी घसरुन 26.71 डॉलर प्रति औंस झाली आहे.

दरम्यान, बुधवार 17 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 157 रुपयांनी घसरला होता. यामुळे सोन्याचा भाव दर दहा ग्रॅम 46 हजार 720 रुपये झाला होता. त्याच दिवशी चांदीच्या भाव 109 रुपयांनी घसरण पहायला मिळाली होती. त्यामुळे चांदीचा भाव 69 हजार 465 रुपयांवर पोहोचला होता.

थोडक्यात बातम्या-

शिवभक्त म्हणून माझाही हिरमोड झाला, पण…- अमोल कोल्हे

काही साप चावतात तर काही चावत नाही, त्यांना ठेचायचं असतं- उद्धव ठाकरे

ऐकावं ते नवलंच! गर्लफ्रेंडला प्रेग्नंट करून तिच्या आईसोबत बॉयफ्रेंडचं पलायन

अजितदादांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘ती’ भााषा शिकणार- उद्धव ठाकरे

गलवान खोऱ्यात ‘इतके’ सैनिक गमावले; चीनने पहिल्यांदा दिली कबुली

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More