नवी दिल्ली | सोन्याच्या भावात वारंवार चढ-उतार पहायला मिळत असतात. अशातच आज मल्टी कमोडिटी एक्ससेंजवर सोन्याच्या भावात घट झाल्याचं पहायला मिळत आहे. सकाळी 10.25 वाजता सोन्याचा भाव 157 रुपयांनी घसरला. यामुळे सोन्याचा भाव दर दहा ग्रॅम 46 हजार 720 रुपये झाला आहे. सोन्याच्या भावासोबतच चांदीच्या भावातही घसरन झाल्याचं दिसतं आहे.
चांदीचा भाव 109 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे चांदीचा भाव 69 हजार 465 रुपयांवर पोहचला आहे. 16 फ्रेब्रुवारीला सोन्याच्या किंमतीमध्ये 9 रुपयांनी घसरण झाली होती. तर चांदीच्या भावात 95 रुपयांनी वाढ झाल्यामुळे चांदीचा भाव 69 हजार 530 रुपयांवर पोहचला असल्याचं पहायला मिळालं होतं.
जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याचे भावात किरकोळ वाढ झाली असून, 1821 प्रति औंसवर पोहोचले आहेत. तर चांदीचा दर औंस 27.60 डॉलरवर स्थिरावल्याचं दिसत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहेत.
थोडक्यात बातम्या-
गजानन मारणेनंतर आता ‘या’ कुख्यात गुंडावर गुन्हा दाखल
टूल-किट प्रकरणातील संशयितांची न्यायालयात धाव; न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय!
वाहतूक नियमांचं पालन कसं करावं?; शाळकरी मुलांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल
महिला वर्षभर ‘लिव्ह इन’मध्ये राहून नंतर सांगतात माझ्यावर बलात्कार झाला- अबू आझमी
पुढील दोन दिवसांत ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज