बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजही सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दर स्थिर; वाचा ताजे दर

नवी दिल्ली |  सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोनं घालून मिरवणं एवढंच नव्हे, तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देतात. अलिकडे काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सोने बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड अनुभवायला मिळत आहे. तसेच आज देखील एमसीएक्सवर सोन्याच्या दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. आज प्रति तोळा सोन्यामागे 10 रुपयांची वाढ झाली आहे. 10 रुपयांच्या वाढीसह आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 47 हजार 160 रुपये प्रती तोळ्यावर आले आहे.

सोन्याच्या दरात आज काहीशी वाढ झाली असली तरी चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज एमसीएक्सवर प्रति किलो चांदीचा दर 67 हजार 900 रुपये आहे. काल 400 रुपयांच्या वाढीसह चांदीचा हा दर होता. कालचाच हा दर आज देखील स्थिर आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या – 

“ओबीसींच्या आरक्षणासाठी फडणवीसांनी मार्ग सांगावा, त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही”

“राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहेत, खातात शिवसेनेचं पण जागतात शरद पवारांच्या निष्ठेला”

देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, पण चिंता कायम, पाहा आकडेवारी

पुण्यातील 91 गावं कोरोना हाॅटस्पाॅट म्हणुन घोषित; कमी झालेली संख्या पुन्हा वाढली

“कंगनाचा इंदिरा गांधी चित्रपट फ्लॉप होणार, कारण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More