Gold Rate l आजचा दिवस शेअर मार्केटसाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे. कारण आज शेअर मार्केटमध्ये मोठ्या उलाढाली झाल्याचे दिसून येत आहे. आज कमोडिटी बाजारातही थोडी नरमाई दिसून आली आहे. तर सोन्याचे दर हे भारतीय वायदे बाजारात कोसळले होते. तर चांदीच्या दरात देखील घट झाल्याचे दिसून येत आहे. तर आज आपण आजचे सोन्याचे व चांदीचे दर काय आहेत हे जाणून घेणार आहोत.
आजचे सोन्याचे दर काय? :
आज सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे 24 कॅरेट असलेल्या 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 70,580 रुपये इतके आहे. तर मागील व्यवहारात सोनं 70 हजार 310 रुपये होते. त्यामुळे आज सोनं तब्बल 270 रुपयांनी वाढलं आहे.
याशिवाय आज चांदीच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. आज चांदी तब्बल 80,466 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. त्यामुळे चांदी अवघ्या 77 रुपयांनी घसरली आहे. शुक्रवारच्या बाजारभावाप्रमाणे चांदी 80,543 रुपये होती.
Gold Rate l सोन्याच्या किमतीत वाढ :
सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या उत्पनामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
आजच्या बाजारभावाप्रमाणे, आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 250 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आज 22 कॅरेट सोने प्रतितोळा 64,700 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 270 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे 24 कॅरेट प्रतितोळा सोनं 70,580 रुपये झाले आहे.
मुंबई व पुण्यात सोन्याचे दर काय आहेत? :
22 कॅरेट सोनं- 64,700 रुपये
24 कॅरेट सोनं- 70, 580 रुपये
18 कॅरेट सोनं- 52, 940 रुपये
News Title : Today Gold Rate
महत्त्वाच्या बातम्या-
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्यासाठी ‘या’ लिंकवर क्लिक करा
हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सना मोठा झटका; कोट्यवधी रुपये बुडाले
वाहनचालकांना झटका! ‘या’ शहरांत पेट्रोल महागलं, जाणून घ्या आजचे दर
तुम्हीही कर्ज घेतले आहे का? तर CIBIL बाबतचा नवीन नियम नक्की जाणून घ्या
मोठी बातमी! अजित पवारांच्या जीवाला धोका? कार्यकर्ते टेन्शनमध्ये