Gold Rate l गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहेत. अशातच सोने व चांदीने रेकॉर्ड देखील ब्रेक केले आहेत. अशातच आता सोने आणि चांदी या धातूने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. कारण आज सोने आणि चांदीच्या भावात काही प्रमाणात घसरण झाली आहे.
सोने खरेदीदारांना दिलासा :
या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीचे भाव वधारले होते. मात्र त्यानंतर या दोन्ही धातूंनी काही प्रमाणात उसळी घेतली होती. तसेच अखेरच्या सत्रात देखील सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र आता हे दोन्ही धातू स्वस्त झाले आहेत. त्यामुळे सोने व चांदीच्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
यावेळी सोने खरेदीदारांच्या खिशाला कमी झळ बसणार आहे. कारण आता 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Gold Rate l चांदी तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी घसरली :
गेल्या आठवड्यात चांदी तब्बल 4,000 रुपयांनी महागली होती. मात्र या आठवड्यात चांदीने एकदाच मोठी उडी घेतली होती. इतर दिवशी चांदीमध्ये घसरण होत होती. याशिवाय 20 ऑगस्टला देखील चांदी 1 हजार रुपयांनी कमी झाली होती. तर 21 आणि 22 ऑगस्टला चांदीचा भाव हा स्थिर झाला होता.
अशातच आज देखील चांदीचे दर कमी होऊन एक किलो चांदीचा भाव 86,700 रुपये निश्चित झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कोणत्याही प्रकारचा कर व शुल्क नसते. तर सराफा बाजारात देखील शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते.
News Title – Today Gold Rate
महत्त्वाच्या बातम्या-
सतर्क! पुढील काही तासांत धो-धो बरसणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
कोलकात्यात पुन्हा धक्कादायक घटना; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारच्या काचा फोडल्या अन् ..
महाराष्ट्रावर शोककळा! नेपाळ बस दुर्घटनेत जळगावच्या 27 भाविकांचा मृत्यू
मोठी बातमी!’गब्बर’चा क्रिकेटला अलविदा; शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर
आज महाराष्ट्र बंद आहे की नाही?, कोर्टाच्या मनाईनंतर मविआने घेतला मोठा निर्णय