Gold Rate l आठवड्याच्या शेवटी ग्राहकांना एक मोठा झटका बसला आहे. सोन्याच्या व चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही धातूत नरमाई झाली होती. मात्र गेल्या चार दिवसाच्या पडझडीनंतर मौल्यवान धातूंनी देखील उसळी घेतली आहे. तसेच आज सोन्याने मोठी भरारी घेतली आहे तर पाठोपाठच चांदीने देखील मुसंडी मारली.
सोन्याच्या किंमतीत वाढ? :
या आठवड्यात सोन्याच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. म्हणजेच सोने 1300 रुपयांनी कमी झाले होते. तर आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोने 64,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव हा 70,024 रुपये आहे.
या आठवड्यात चांदी हा धातू 4200 रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र अखेरच्या सत्रात चांदीमध्ये 1500 रुपयांची वाढ झाली आहे. तर 5 ऑगस्टाला चांदी 200 रुपयांनी महागली होती. चांदीच्या या पडझडीनंतर आज एक किलो चांदीचा भाव 83,000 रुपये आहे.
Gold Rate l 14 ते 24 कॅरेटचा भाव काय आहे?
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 69663 रुपये आहे. तर 23 कॅरेट सोन्याचा भाव हा 69,३८४रुपये आहे. याशिवाय आज 22 कॅरेट सोने 63,811 रुपयांवर घसरले आहे. तर 18 कॅरेट आता 52,247 रुपये आहे व 14 कॅरेट सोने 40,753 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे एक किलो चांदीचा भाव 80,263 रुपये इतका आहे.
ग्राहकांना सोने-चांदीच्या किंमती घरबसल्या जाणून घेता येणार आहेत. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या तसेच शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येत असतात. ग्राहक घरबसल्या किमती जाणून घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
News Title : Today Gold Rate
महत्त्वाच्या बातम्या-
म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज सुरू, 2030 घरांची विक्री होणार, जाणून घ्या सर्व काही
राजकीय घडामोडींना वेग! बच्चू कडू शरद पवारांच्या भेटीला, महायुतीला देणार धक्का?
…म्हणून ‘या’ दिवशी अहमदनगरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर!
सिनेविश्वात शोककळा! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप
विनेश फोगाटला मेडल मिळणार?, अपात्रतेच्या सुनावणीत काय घडलं?