Gold Silver Rate l गेल्या महिन्यापासून सोने, चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सोन खरेदी करणाऱ्यांना दरवाढीचा सामना करावा लागला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर काही प्रमाणात घसरले होते. मात्र आता सोन्याने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. तर आज आपण सोने आणि चांदीचे दर काय आहेत हे जाणून घेऊयात…
सोन्याच्या किंमतीत वाढ :
सर्वसामान्य ग्राहकांना सोने व चांदीच्या वाढत्या बाजारभावामुळे जादा पैसा मोजावा लागणार आहे. मार्च आणि एप्रिलनंतर मे महिन्यात देखील या धातूंनी विक्रम केला आहे. गेल्या आठवड्यात अक्षय तृतीयेला सोन्याने चांगलीच उसळी घेतली होती. मात्र या आठवड्यात काही प्रमाणात घसरण झाल्याने किमतीत देखील काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. येत्या 13 मे ला सोने 100 रुपयांनी तर 14 मे ला 400 रुपयांनी स्वस्त झाले होते. अशातच 15 मे रोजी दरात वाढ झाली. तर 16 मे ला सोने तब्ब्ल 770 रुपयांनी वाढले आहे.
गुडरिटर्न्सनुसार वेबसाइटनुसार, आज 22 कॅरेट सोने 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या वाढत्या बाजारभावामुळे सोने खरेदी करणे देखील सर्वसामान्यांसाठी अवघड झाले आहे. येत्या काळात लगीनसराई असल्याने सोन्याच्या किंमती अजून वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Gold Silver Rate l चांदीच्या किंमती वाढल्या :
गेल्या आठवड्यात अक्षय तृतीयेला चांदीचे दर वाढले होते. अशातच आता या आठवड्यात चांदीच्या दरात चढउतार सुरु आहे. 13 मे ला चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली होती तर 14 मे रोजी 700 रुपयांनी वधारली होती. अशातच 15 मे ला त्यात 400 रुपयांची भर पडली आहे.
16 मे रोजी 1500 रुपयांनी किंमती वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत चांदीने 2600 रुपयांची भरारी घेतली आहे. गुडरिटर्न्सनुसार वेबसाइटनुसार, एक किलो चांदीचा भाव आज 89,100 रुपये आहे. सोन्याच्या वाढत्या दरासोबतच चांदीच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
News Title – Today Gold Silver Rate
महत्त्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदे गटाला सर्वात मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्यानी दिला तडकाफडकी राजीनामा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्यात ‘या’ दिवशी मान्सून दाखल होणार
या राशीच्या व्यक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी
अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!
“नकली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार”; मोदींच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया