या तीन राशींचे जून महिन्यात नशीब उजळणार; मिळेल सुख, समृद्धी अन् संपत्ती

Today Horoscope l मेष:- स्वपराक्रमाने कार्य सिद्धीस न्याल. नवीन कामास दिवस अनुकूल आहे. जुने करार मार्गी लागतील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गृह सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. शुभ अंक १, शुभ रंग हिरवा

वृषभ:- अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल. नवीन योजनेवर काम चालू करावे. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. शुभ अंक ३, शुभ रंग विटकरी

मिथुन:- आपल्या कर्तबगारीवर कामे मिळवाल. छोटे प्रवास घडतील. रचनात्मक काम करण्यावर भर द्यावा. अतिविचारात अडकून पडू नका. वरिष्ठ सहकार्‍यांचे चांगले सहकार्य लाभेल. शुभ अंक ५, शुभ रंग लाल

कर्क:- परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. मेहनतीचे तत्काळ फळ मिळेल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. सुख, समृद्धी अन् संपत्ती लाभणार आहे. शुभ अंक ८, शुभ रंग नारंगी

सिंह:- आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल. आपल्या व्यासंगाचा फायदा होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल. शुभ अंक ७, शुभ रंग पिवळा

Today Horoscope l कन्या:- आपले विनयशील वागणे लोकांना आवडेल. योग्य शिस्तीचा फायदाच होईल. कामाचा ताण जाणवेल. कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल. शुभ अंक ९, शुभ रंग जांभळा

तूळ:- हातातील काम शेवटपर्यंत लावून धरा. गोड बोलून कामे साध्य करून घ्याल. काही समस्या चर्चेतून सोडवाव्या. नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल. समाधानकारक यश मिळेल. शुभ अंक २, शुभ रंग गुलाबी

वृश्चिक:- जुन्या प्रश्नातून मार्ग काढावा. अतिमसालेदार पदार्थ खाऊ नका. कामाच्या नवीन संधीचा फायदा घ्या. नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे. उत्साहाने कार्यरत राहाल. शुभ अंक ७, शुभ रंग निळा

धनू:- कार्य पूर्ण करण्यात कुशलता मिळवाल. चुकून एखाद्यावर अति विश्वास ठेवाल. जोखीम पत्करल्याने लाभ मिळू शकतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. यशाचा पाठलाग कराल. शुभ अंक ८,शुभ रंग नारंगी

मकर:- हातातील कामांची यादी पूर्ण होईल. घरातील काही खर्च निघतील. तज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. शुभ अंक ५ ,शुभ रंग लाल

कुंभ:- कल्पनेतून बाहेर येऊन कामाला लागावे. जुन्या कामावर खर्च होईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. समाजसेवा करण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी मतभेद दूर होतील. शुभ अंक ३, शुभ रंग विटकरी

Today Horoscope l मीन:- सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. खर्चाचा अंदाज बांधावा. व्यापारातील जोखीम सकारात्मक परिणाम देईल. जोडीदाराच्या भावनेचा व मतांचा आदर करावा. शुभ अंक १, शुभ रंग हिरवा

News Title – Today Horoscope

महत्वाच्या बातम्या-

अजित पवार गटाचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? ‘या’ नेत्याचा मोठा आरोप

या तीन राशींचे जून महिन्यात नशीब उजळणार; मिळेल सुख, समृद्धी अन् संपत्ती

अभिनेता सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; पोलिसात तक्रार दाखल

शरद पवारांना सर्वात मोठा धक्का बसणार?; ‘या’ नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

“मोदी पंतप्रधान होणार नाहीत, लोकांनी केवळ स्टंट म्हणून त्यांच्याकडे पाहावं”