या राशीच्या व्यक्तींना आर्थिक धनलाभ संभवतो

Today Horoscope l मेष:- मनाची चंचलता जाणवेल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवावा. आपल्याच मतावर आग्रही राहाल. कामातील द्विधावस्था टाळावी. काही बदलांना सामोरे जावे लागेल. शुभ अंक ३, शुभ रंग जांभळा

वृषभ:- इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. जुगाराची आवड जोपासाल. काही गोष्टी स्पष्टपणे बोलणे टाळा. चटकन निराश होवू नका. अनाठायी खर्च टाळावा. शुभ अंक ७, शुभ रंग पोपटी

मिथुन:- लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. वयस्कर व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. घरातील वातावरण खेळकर राहील. काही गोष्टी जाणून बुजून लपवून ठेवाल. चित्त एकाग्र करावे. शुभ अंक ८, शुभ रंग गुलाबी

कर्क:- जवळच्या ठिकाणी जाण्याचा योग येईल. मानसिक शांतता शोधाल. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. शुभ अंक २, शुभ रंग पांढरा

सिंह:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील अडचणी दूर करता येतील. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्याल. वडीलधार्‍यांचा सल्ला मोलाचा ठरेल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन बाळगावा. शुभ अंक १, शुभ रंग पोपटी

कन्या:- आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल. काही गोष्टींना उशिरा वाव मिळेल. योग्य संधीची वाट पाहावी. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. पारमार्थिक कामात मदत कराल. आर्थिक धनलाभ संभवतो. शुभ अंक २, शुभ रंग जांभळा

Today Horoscope l तूळ:- मानसिक ताणतणाव राहील. पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून वादविवाद संभवतात. गुंतवणुकीचा नवीन पर्याय विचारात घ्या. नैराश्याला बळी पडू नका. तडजोडीला पर्याय नाही. शुभ अंक ३, शुभ रंग निळा

वृश्चिक:- उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. व्यापारी वर्ग खुश राहील. प्रवासात काळजी घ्यावी. हातातील कामात यश येईल. चार चौघांत कौतुकास पात्र व्हाल. शुभ अंक ९, शुभ रंग विटकरी

धनू:- कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वादविवाद सामोपचाराने सोडवावेत. बोलताना शब्द जपून वापरावेत. कामाचा ताण जाणवेल. डोळ्यांची काळजी घ्यावी. शुभ अंक १, शुभ रंग हिरवा

मकर:- अडथळ्यातून मार्ग काढता येईल. आपलेच म्हणणे खरे कराल. उष्णतेचे विकार संभवतात. शांततेचे धोरण स्वीकारावे. मेहनतीवर भर द्याल. शुभ अंक ७, शुभ रंग काळा

कुंभ:- अतिविचार करणे टाळावे. घरगुती सौख्याचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल. भावंडांचा सल्ला घ्याल. तर्कसंगत विचार करावा. शुभ अंक ५, शुभ रंग नारंगी

Today Horoscope l मीन:- आपले मत ठामपणे मांडाल. कामात प्रगतीला वाव आहे. जमिनीच्या कामातून चांगला फायदा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. शुभ अंक १, शुभ रंग पोपटी

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता शशांक केतकर यांची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; ‘इतके’ आमदार शरद पवारांकडे परतणार?

“माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी..”; निलेश लंकेंच्या आईच्या आरोपांनी खळबळ

चिन्हामुळे झाला घोळ; शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं कारण समोर

धक्कादायक! पुण्यातील ‘या’ भागात पूरसदृश्य पाऊस, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण