या राशीच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळावा

Today Horoscope l मेष:- कामाची धावपळ वाढू शकते. गुंतवणुकीचा चांगला पर्याय निवडाल. कामातील मोबदल्याकडे लक्ष द्यावे. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. स्वकष्टावर अधिक भर द्याल. शुभ अंक २, शुभ रंग जांभळा

वृषभ:- आवडी निवडीबाबत लक्ष द्याल. हसत-हसत आपले मत मांडाल. गोड बोलून कार्यभाग साधता येईल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. लोकांवर तुमची उत्तम छाप पडेल. शुभ अंक ४, शुभ रंग हिरवा

मिथुन:- कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. क्षणिक सौख्यात रमून जाल. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात दक्षता बाळगावी. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात. शुभ अंक ६, शुभ रंग नारंगी

कर्क:- क्षुल्लक वाद वाढवू नये. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. सरकारी कामे पुढे सरकतील. जोडीदाराची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. शुभ अंक ५, शुभ रंग काळा

सिंह:- प्रकृतीची हेळसांड करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्यावे. कामातील लाभाकडे दुर्लक्ष नको. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. आज प्रवास टाळावा. शुभ अंक १, शुभ रंग लाल

कन्या:- भांडखोर लोकांपासून दूर राहावे. कामाचा ताण जाणवेल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावे. उष्णतेचे विकार संभवतात. तुमच्याबद्दल लोकांचा गैरसमज होऊ शकतो. शुभ अंक ७, शुभ रंग पोपटी

तूळ:- मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मैदानी खेळाची आवड जोपासाल. कामे वेळेत पार पडतील. जमिनीच्या व्यवहारातून लाभ संभवतो. शुभ अंक ४, शुभ रंग जांभळा

वृश्चिक:- वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. भाजणे, खरचटणे यांसारखे त्रास संभवतात. दिवसभर कामाचा त्रास राहील. प्रवासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. संभाषण कौशल्य दाखवण्याची संधी लाभेल. शुभ अंक २, शुभ रंग गुलाबी

Today Horoscope l धनू:- कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्याल. परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. टीकेमुळे निराश होऊ नका. मनाची चंचलता अध्यात्माने दूर करण्याचा प्रयत्न करावा. अधिकारांची जाणीव ठेवावी. शुभ अंक ५, शुभ रंग हिरवा

मकर:- निराशाजनक विचार करू नये. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. आळस बाजूला सारून कामे करावीत. बोलताना तिखट शब्दांचा वापर कमी करावा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नये. शुभ अंक ८, शुभ रंग विटकरी

कुंभ:- कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. चटकन रागवू नका. घाई-घाईने कोणतेही कृती करू नका. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. अवाजवी अपेक्षा बाळगू नका. शुभ अंक १, शुभ रंग पिवळा

Today Horoscope l मीन:- जुनी इच्छा पूर्णत्वास येईल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उत्तम व्यावसायिक लाभ मिळेल. थोरांचा मोलाचा सल्ला मिळेल. सामुदायिक वादविवादापासून दूर राहावे. शुभ अंक ७, शुभ रंग पांढरा

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या- 

पहिल्याच टर्ममध्ये मुरलीधर मोहोळांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ!

पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने तरुणाची आत्महत्या; पंकजा मुंडे म्हणाल्या…

रामदास आठवले यांच्यासह महाराष्ट्रातील ‘हे’ नेते घेणार शपथ!

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरात उभी फूट, सख्खे भाऊ आले आमने-सामने

विजयी हॅट्रिकसह नितीन गडकरी तिसऱ्यांदा बनले कॅबिनेट मंत्री!