आज पुत्रदा एकादशी, भगवान विष्णू ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

Today Horoscope 10 January 2025

Today Horoscope 10 January 2025 | आज 10 जानेवारीरोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. एकादशी तिथी शुक्रवारी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांपर्यंत चालेल. त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होईल. आज दुपारी 2 वाजून 37 मिनिटांपर्यंत शुभ योग जुळून येईल. याशिवाय आज पुत्रदा एकादशी सुद्धा असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची विधीवत पूजा केली जाते. तर आज भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मी कोणत्या राशीवर विशेष कृपा ठेवणार ते पाहुयात- (Today Horoscope 10 January 2025 )

आजचे राशीभविष्य

मेष- नवीन संधी देणारा दिवस
आज तुम्हाला नोकरीसंबंधी नवीन संधी मिळतील. भविष्याची फार जास्त चिंता करू नका. जवळच्या नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल. काही प्रश्न लवकरच निकालात निघतील. तुमच्या प्रश्नांची देखील तुम्हाला उत्तरे मिळतील.

वृषभ- नातेसंबंध सुधारतील
प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदी जाईल. तुमचे बिघडलेले नातेसंबंध सुधारतील. वाद-विवाद संपुष्टात येतील. आजचा दिवस कायम स्मरणात राहण्यासारखा जाईल. देवाणघेवाण करताना सावध राहावे. आज जवळचा प्रवास योग देखील आहे.

मिथुन- नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल 
आज सुखद अनुभव येतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल. चर्चा सकारात्मक असेल. वरिष्ठ तुमच्या कामावर प्रभावित होतील.तुम्हाला आज बढती देखील मिळू शकते. (Today Horoscope 10 January 2025 )

कर्क- धनलाभाची शक्यता आहे
तुमच्यावर आज भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा असेल. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल. दिवस धावपळीत जाईल.

सिंह- नवीन जबाबदारी मिळणार
आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आज तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल. भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला त्याचा फायदा होईल.

कन्या- मनातील इच्छा पूर्ण होणार
भगवान विष्णु आज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील. अनपेक्षित लाभ मिळू शकतात. मात्र फार हुरळून जाऊ नका. द्विधा मनस्थितीतून बाहेर यावे. आज धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. (Today Horoscope 10 January 2025 )

News Title : Today Horoscope 10 January 2025

महत्वाच्या बातम्या –

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादांनी मौन सोडले!

पुण्यातील मगरपट्टा ते एफसी रोड, आकाची संपत्ती किती?

वाल्मिक कराडवर ED ची कारवाई का होत नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची अनोखी प्रेमकहाणी, बायको जापनीज कशी काय?

संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरपंच परिषद आक्रमक; केल्या ‘या’ मागण्या

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .