Today Horoscope | आज 10 मार्च 2025 रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून ती आज सकाळी 7:45 पर्यंत असेल, त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होईल. दुपारी 1:57 पर्यंत शोभन योग असून, पुष्य नक्षत्र रात्री 12:52 पर्यंत प्रभावी राहील. या दिवशी राहू काळ सकाळी 7:30 ते 9:00 दरम्यान असेल. याशिवाय आज आमलकी एकादशी देखील आहे. व्रत-पूजनासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. (Today Horoscope)
आजचे राशीभविष्य (10 March 2025 Horoscope)
मेष: सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मकता राहील. नवीन ओळखी होतील. जवळच्या लोकांमध्ये वेळ घालवाल. कामाचे नियोजन व्यवस्थित कराल आणि जोडीदारासोबत आनंदी राहाल.
वृषभ: व्यवसायिक दृष्टीने चांगला दिवस आहे. लेखन, अध्यापन क्षेत्रातील लोकांसाठी प्रगतीचे संकेत आहेत. हुशारीने आणि कल्पकतेने स्वतःसाठी संधी निर्माण कराल.
मिथुन: कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. धोरणीपणा ठेवावा लागेल. शिस्तबद्ध जीवनशैली तुमच्यासाठी फायद्याची ठरेल.
कर्क: कुटुंबातील भावंडांसोबत सुसंवाद साधावा. मानसिक तणाव जाणवू शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. अविचाराने वेळ वाया घालवू नका.
सिंह: जोडीदाराच्या स्वभावगुणांमुळे समाधान मिळेल. व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. सहकाऱ्यांचा विश्वास जिंकाल आणि विरोधकांवर मात कराल.
कन्या: कोणाच्याही फसव्या बोलण्याला भुलू नका. जुन्या वादांमध्ये गुरफटू नका. कोणताही निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.
तूळ: बौद्धिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना लाभ होईल. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. घरगुती शांततेसाठी प्रयत्न करावेत. वाहन चालवताना सतर्क राहा.
वृश्चिक: संभाषण कौशल्याने प्रभाव टाकाल. नवीन ओळखी होतील. प्रेमळ स्वभावाने लोकांना आपलेसे कराल. मात्र, भावंडांसोबतचे संबंध जपावेत. (Today Horoscope)
धनू: अहंकार टाळावा. मनाची स्थिरता राखा. अनावश्यक खर्च टाळा. नवीन संधी मिळू शकतात, त्यांचा लाभ घ्या.
मकर: विचारपूर्वक निर्णय घ्या. बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. कला आणि अध्यात्माकडे ओढ वाढेल. गैरसमजातून वाद टाळावेत.
कुंभ: गोष्टींचे आकलन चटकन होईल. स्मरणशक्ती चांगली राहील. अभ्यासूपणे प्रत्येक गोष्ट समजून घ्याल. संवादात विनम्रता ठेवा. (Today Horoscope)
मीन: व्यावसायिक लाभ मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बढतीच्या संधी येऊ शकतात. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करा.
Title : Today Horoscope 10 March 2025