Today horoscope | आज 11 डिसेंबररोजी, मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत राहील. तसेच बुधवारी वरियन योग संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. याच दिवशी गीता जयंती असते. या दिवशी भगवद्गीतेचे पठण केले जाते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली होती. आजच्या या शुभ दिनी कोणत्या राशीला फायदा होईल, ते पाहुयात. (Today horoscope )
आजचे राशीभविष्य
धनू:- पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुम्हाला आज शेअर मार्केटमध्ये मोठा लाभ मिळेल. तुमच्या मनातील शंका आज दूर होतील. तुम्हाला आज अचानक धनलाभ होण्याची देखील दाट संभावना आहे. कुटुंबात तुमचा सन्मान वाढेल. तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने व्यावसायिक संधी प्राप्त होतील. (Today horoscope )
मकर:- कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल.तुम्हाला आज कामासंबंधी प्रवास करावा लागेल. तुम्हाला आज जवळच्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळू शकते. विद्यार्थी वर्गाला नवीन संधी मिळतील. महिलांसाठी आजचा दिवस धावपळीचा असेल.
कुंभ:- आजचा दिवस आनंदी जाईल. जुन्या आठवणीत मन रमेल. तुम्हाला आज तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. शांत राहण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबासोबत मतभेद होऊ शकतात, तुम्ही मात्र समजदारपणे सर्वकाही हाताळाल. तुम्हाला आज लक्ष्मीच्या कृपेने धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. (Today horoscope )
News Title – Today Horoscope 11 december 2024
महत्वाच्या बातम्या-
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी!
मंत्रिमंडळात कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? उदय सामंतांनी दिल उत्तर
असली उंदर पवारसाहेब… पडळकर- खोतांच्या जहरी टीकेला ‘या’ नेत्याचं प्रत्युत्तर
100 शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला…; पडळकरांची पवारांवर एकेरी टीका
तिने ऑफिसमध्ये जे पाहिलं… राज कुंद्राबद्दल सर्वात मोठा खुलासा