आज शनिप्रदोष, ‘या’ राशींवर होणार थेट परिणाम; सतर्क राहावे अन्यथा…

Today Horoscope 11 January 2025

Today Horoscope 11 January 2025 | आज 11 जानेवारीरोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी शनिवारी सकाळी 8 वाजून 22 मिनिटांपर्यंत चालेल. तसेच रोहिणी नक्षत्र शनिवारी दुपारी12 वाजून 29 मिनिटांपर्यंत जागृत असेल. तसेच आज राहू काळ सकाळी 9 वाजता सुरु होईल ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार आहे. याशिवाय आज शनिप्रदोष व्रत असणार आहे. याचा परिणाम काही राशीवर थेट होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी सतर्क राहावे अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. (Today Horoscope 11 January 2025)

आजचे राशीभविष्य

मेष- व्यवसायात लाभ होईल
आज तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. व्यवसायात काही नवीन लोक भेटतील. व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला मोठी आर्थिक मदत होईल.
शुभ रंग – पांढरा आणि पिवळा
शुभ अंक – 1 आणि 2

वृषभ- नात्यात वाद-विवादाची शक्यता
आज तुमच्या वैवाहिक जीवनात वाद-विवाद होऊ शकतात. कुटुंबात काही तणाव निर्माण होईल. तुम्हाला तो टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल.कठोर शब्द वापरू नका, अन्यथा संबंध आणखी बिघडू शकतात. कोणत्याही धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. (Today Horoscope 11 January 2025)
शुभ रंग- लाल व हिरवा
शुभ अंक – 4 आणि 6

मिथुन – पैशांची उधळपट्टी होईल
सामाजिक कार्यक्रमांवर पैसे खर्च कराल. इतर कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवू नका. विद्यार्थ्यांना ज्ञान आणि अनुभव मिळेल. आज सूर्य देवाला जल अर्पण करा, जीवनात असलेल्या अडचणी दूर होतील.
शुभ रंग- आकाशी व हिरवा
शुभ अंक – 4 आणि 6

कर्क – रखडलेल्या कामांना गती मिळेल
आज रखडलेले काम पूर्ण करण्यास भावाची मदत मिळेल. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबातील सदस्यांची मान्यता मिळेल. व्यवसायात देखील तुम्हाला आज लाभ होईल.
शुभ रंग – जांभळा आणि हिरवा
शुभ अंक – 1 आणि 2

सिंह – आर्थिक अडचणी भासतील
तुमच्यावर आज शनिप्रदोषचा परिणाम जाणवू शकतो. तुम्हाला आज आर्थिक अडचणी जाणवू शकतात. मालमत्ता संबंधी आज कोणताही व्यवहार करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. दिवसाच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळेल. आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला.
शुभ रंग – लाल आणि पिवळा
शुभ अंक – 1 आणि 9

कन्या – वादात अडकू नका
आज तुम्हाला व्यवसायात नवीन योजना राबवाव्या लागतील. मुलांसाठी वेळ काढू शकणार नाही, त्यामुळे नाराज राहातील. नोकरदार लोकांनी कोणत्याही वादात पडणे टाळावे. अडचणी निर्माण होऊ शकतात. (Today Horoscope 11 January 2025)
शुभ रंग – पांढरा आणि निळा
शुभ अंक – 3 आणि 5

News Title : Today Horoscope 11 January 2025

महत्वाच्या बातम्या –

पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यापासून ‘हे’ शेतकरी राहणार वंचित?

“पप्पा… आम्हाला माफ करा”, देशमुखांच्या लेकीने हंबरडा फोडला

मुन्नी मला घाबरत आहे?, सुरेश धस यांचा हल्लाबोल

‘अण्णा माझे दैवत…’ म्हणणारा बीडचा गोट्या गीते कोण?

“…तर सरपंच देशमुखांचे प्राण वाचले असते”; खळबळजनक खुलासा समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .