या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ होणार

Today Horoscope l मेष:- आपल्या तत्ववादी स्वभावाला मुराद घालावी लागेल. नवीन वाचन वा लिखाण चालू करावे. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. फिरायला जाण्याची संधि मिळेल. नवीन ओळख होईल. शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा

वृषभ:- घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. खाण्या-पिण्याची रेलचेल होईल. व्यापार्‍यांनी आळस दूर सारावा. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. सामाजिक कामात सहभागी होता येईल. शुभ अंक ९, शुभ रंग नारंगी

मिथुन:- सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. मित्रांशी सलोख्याने वागावे. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. निराशाजनक विचार करू नका. जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक बाजू संतुलित ठेवावी. शुभ अंक १, शुभ रंग हिरवा

कर्क:- गरज नसताना आक्रमक होऊ नका. बौद्धिक कौशल्य दाखवा. घरातून काम करण्याची संधी चालून येऊ शकते. नवीन प्रस्तावांकडे लक्ष ठेवावे. भेटवस्तू मिळण्याची शक्यता. शुभ अंक ३, शुभ रंग निळा

सिंह:- मुलांचे प्रेम वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्साहाने कार्यरत राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. रियल इस्टेट करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मोबदला मिळेल. शुभ अंक ६, शुभ रंग लाल

कन्या:- बोलण्यातून लोकसंग्रह वाढवाल. घरातील लोकांशी सल्लामसलत करावी. सहकार्‍यांचे उत्तम सहकार्य लाभेल. रचनात्मक कामे करावीत. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. शुभ अंक २, शुभ रंग पोपटी

Today Horoscope l तूळ:- जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. छोटे प्रवास घडतील. वैयक्तिक समस्या सोडवता येतील. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते. शुभ अंक ७, शुभ रंग नारंगी

वृश्चिक:- मनाची चलबिचलता जाणवेल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या. तरूणांशी मैत्री वाढेल. क्षुल्लक मानसिक समस्या जाणवू शकतात. संयमाने परिस्थिती हाताळा. शुभ अंक ५, शुभ रंग निळा

धनू:- तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. मानसिक शांतता लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मदत करताना ऊर्जा वाया घालवू नका. टीकेकडे लक्ष देऊ नका. शुभ अंक ८, शुभ रंग काळा

मकर:- व्यापारासाठी योग्य काळ. कामाचा उरक वाढेल. व्यापारी वर्ग खुश राहील. अधिकारी तुमचे कौतुक करतील. दिनक्रम व्यस्त राहील. शुभ अंक ४, शुभ रंग लाल

कुंभ:- नवीन गोष्टी शिकाल. भावनेला आवर घालावी. भावंडांची बाजू समजून घ्यावी. गोष्ट अधिक प्रमाणात ताणू नये. मनाचा आवाज ऐकावा. शुभ अंक ९, शुभ रंग पिवळा

Today Horoscope l मीन:- घाईघाईने निर्णय घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता. योग्य जागी गुंतवणूक कराल. शेअर्स मध्ये लाभ संभवतो. कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ नका. शुभ अंक ७, शुभ रंग निळा

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! मुरलीधर मोहोळांना मिळालं ‘हे’ महत्त्वाचं खातं

नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ जाहीर, कुणाला कुठलं खातं?, वाचा एका क्लिकवर

“मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही”, मुरलीधर मोहोळांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

“…तर शिवसेना एकत्र येईल”, शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन!