आज कार्तिकी एकादशी, विष्णु देव ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण करणार!

Today Horoscope | आज 12 नोव्हेंबररोजी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. एकादशी तिथी मंगळवारी सायंकाळी 4 वाजून 05 मिनिटांपर्यंत राहील. आज सायंकाळी 7 वाजून 9 मिनिटांपर्यंत हर्ष योग राहील. आज राहू काळ 3 वाजता सुरु होईल आणि 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय आज देवउठनी एकादशी देखील आहे. ही एकादशी कार्तिकी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते.हिंदू धर्मात या एकादशीला मोठे महत्व आहे. (Today Horoscope)

आषाढी एकादशीला निद्राधीन झालेले विष्णू देव या एकादशीला पुन्हा निद्रेतून बाहेर पडतात आणि शुभ मुहूर्तास सुरुवात होते, अशी आख्यायिका आहे. तर, आजच्या या शुभ दिनी भगवान विष्णु देव कोणत्या राशीला आशीर्वाद देणार, ते पाहुयात.

आजचे राशी भविष्य

मेष:- बहु राष्ट्रीय कंपनीत काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. डोळ्यांची काळजी घ्यावी. मनात नसत्या शंका आणू नका.भगवान विष्णुच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील. तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील.

वृषभ:- आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. आज तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांसोबत दिवस मजेत घालवाल. मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. तुम्हाला खूप दिवसापासून हवी असलेली गोष्ट भेट स्वरूपात  प्राप्त होईल. (Today Horoscope)

मिथुन:- कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. दिवसभर कामाची धांदल राहील. वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात. तुमचे आज प्रमोशन होऊ शकते. पगारात भक्कम वाढ होण्याची शक्यता. आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल.

कर्क:- धार्मिक बाबीत रस घ्याल. भगवान विष्णु तुम्हाला प्रत्येक कार्यात यश देतील. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनातील समस्या दूर होतील. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्याल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. (Today Horoscope)

सिंह:- अचानक लाभाची शक्यता. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे.आजोळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. आपले छंद जोपासावेत. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल. (Today Horoscope)

News Title : Today Horoscope 12 November

महत्वाच्या बातम्या –

मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुलगा वयाच्या 12 व्या वर्षापासून ड्रग्सच्या विळख्यात!

महायुती सरकारने गोरगरिबांचं उत्पन्न वाढवण्याचं काम केलं- संभाजी पाटील निलंगेकर

अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर…? शरद पवारांच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

राज्यात नवीन अभियान सुरु; “जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू”

कराळे मास्तरांनी मोदींच्या शिक्षणाचा मुद्दा छेडला! नेमकं काय म्हणाले