Today Horoscope | आज 13 नोव्हेंबररोजी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. तर, रेवती नक्षत्र रात्री 1 वाजून 11 मिनिटांपर्यंत जागृत असेल.तसेच, आज प्रदोष व्रत पाळण्यात येणार असून, या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराची पूजा केली जाते. याशिवाय आज तुळशी विवाह सुद्धा पार पडेल. (Today Horoscope )
तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णू, भगवान शाळीग्राम आणि माता तुळशीची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे. पंचांगानुसार तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त आज संध्याकाळी 7 वाजून 24 मिनिटांपर्यंत असणार आहे. या शुभ दिनी कोणत्या राशीचं भाग्य उजळणार, ते पाहुयात.
आजचे राशी भविष्य
मेष:- घेतलेले कर्ज आज दूर होईल.नको त्या विचारात मग्न होऊ नका. कामे उरकताना कंटाळा येईल. आरोग्याच्या देखील काही तक्रारी जाणवू शकतात. (Today Horoscope )
वृषभ:- आज वाहन खरेदीचा योग आहे. त्यामुळे आनंदी असाल. आजचा दिवस काहीतरी शुभ घटना होण्याचा आहे.
मिथुन:- व्यवसायात चांगला लाभ मिळेल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
कर्क:- आत्मविश्वासाने वागाल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे.
सिंह:- एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो. (Today Horoscope )
कन्या:- आज जवळच्या ठिकाणी प्रवास योग आहे. जोडीदारासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील संभावना आहे.
तूळ:- विवाहस्थळ जुळून येईल. लग्नाची तारीखही लवकरच निश्चित केली जाईल. प्रेमात असलेल्या लोकांना यश मिळेल.
वृश्चिक:- कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आपले आवडते छंद जोपासा.शेअर मार्केटमध्ये आज तुम्हाला फायदा मिळू शकतो.
धनू:- कौटुंबिक सौख्यात दिवस घालवाल. मानसिक समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी.
मकर:- भावंडांशी सुसंवाद साधला जाईल. कामाच्या ठिकाणी चिडचिड होऊ शकते. त्यामुळे डोके शांत ठेवायचा प्रयत्न करा. राजकारणात असलेल्या व्यक्तींना धोका मिळू शकतो. (Today Horoscope )
कुंभ:- जमिनीचे व्यवहार आज करू नये.फसवणुकीपासून सावधानता बाळगा. मामाकडून मदत घेता येईल. आज आवडत्या पदार्थांवर ताव माराल.
मीन:- दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक प्रश्न सुटेल. महिलांसाठी आजचा दिवस उत्साही जाईल. स्वतःसाठी वेळ काढाल. जवळच्या व्यक्तींची भेट होईल.
News Title : Today Horoscope 13 November
महत्वाच्या बातम्या –
‘आमदार नाही तर मंत्री म्हणून…’; संभाजी पाटील निलंगेकरांबद्दल गडकरींचं मोठं वक्तव्य
गद्दार शब्द ऐकताच एकनाथ शिंदे भडकले, रागात गाडीतून उतरले अन्…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांबद्दल व नवऱ्याबद्दल व्यक्त केली खंत!
शरद पवारांचा सदाभाऊ खोतांना मोठा धक्का!
ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना धक्का, कल्याणमधील बड्या नेत्याने सोडली साथ