Today Horoscope 14 January 2025 | आज 14 जानेवारीरोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी मंगळवारी रात्री 3 वाजून 22 मिनिटांपर्यंत राहील. तसेच पुनर्वसु नक्षत्र सकाळी 10 वाजून 17 मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर पुष्य नक्षत्र जागृत होईल. (Today Horoscope 14 January 2025)
राहू काळ 3 वाजता सुरु होईल ते 4 वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय आज वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती हा सण साजरा केला जाईल. आजच्या दिवशी 3 राशीला मोठा फायदा होणार आहे. आता या तीन राशी नेमक्या कोणत्या आहेत ते पाहुयात.
आजचे राशीभविष्य-
मिथुन राशी- प्रिय व्यक्तीसोबत आनंदी दिवस जाईल
आजचा दिवस मिथुन राशीसाठी अत्यंत शुभ असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ व्यतीत करायला मिळेल. आज तुमच्या हातून मोठे धार्मिक कार्य देखील होईल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. पर्यटन आणि मनोरंजनाचा आनंद घ्याल.
कर्क राशी- अचानक धनलाभ होण्याचे संकेत
आज आरोग्याबाबतच्या तक्रारी दूर होतील. आजचा दिवस तीळ-गुळा सारखा गोड म्हणजेच आनंदी आणि उत्साही जाईल. आज तुम्हाला नोकरीच्या संधी चालून येतील, त्या संधीचा फायदा घ्या. नवीन वर्षात वाहन खरेदीचा योग आहे. आज वाहन खरेदीबाबत निर्णय घ्याल. वैवाहिक जीवनात देखील सुखी समाचार मिळतील. (Today Horoscope 14 January 2025)
सिंह राशी- कौशल्याच्या जोरावर नफा कमावण्याची संधी मिळेल
आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. काही अपूर्ण कामे पूर्ण होण्याची चांगली शक्यता आहे. व्यावसायिक करारातून मोठा आर्थिक लाभ होईल. वेळेपूर्वी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहा. अपेक्षेप्रमाणे कामगिरी सांभाळा.आज तुम्हाला मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर नफा कमावण्याची संधी मिळेल. आज तुम्ही कुटुंबासाठी खरेदी कराल. आजचा दिवस आर्थिक फायदा देणारा ठरेल.
News Title : Today Horoscope 14 January 2025
महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांनो ‘ही’ कामाची गोष्ट लवकर करा अन्यथा… पश्चाताप होईल
वाल्मिक कराडला फाशी द्या! ‘या’ आमदाराने केली मागणी
जरांगेंना मिठी मारून धनंजय देशमुख ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
संतोष देशमुखांना ‘या’ व्यक्तींनी दिली होती जीवे मारण्याची धमकी!
आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरवात! जाणून घ्या शाही स्नानाच्या तिथी