Today Horoscope | आज 14 नोव्हेंबररोजी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी आहे. त्रयोदशी तिथी आज सकाळी 9 वाजून 44 मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरू होईल. याशिवाय आज वैकुंठ चतुर्दशी असणार आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. या तिथीला श्रीहरी आणि महादेवाची विशेष पूजा केली जाते. (Today Horoscope )
तसेच सकाळ आणि संध्याकाळी श्रीगणेशाची पूजा केली जाते. यासोबतच भगवान विष्णू, महालक्ष्मी, शिवलिंग आणि पार्वतीची पूजा देखील केली जाते. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते,असं म्हणतात. तर, आजच्या या शुभ दिनी कोणत्या राशीला महादेव आणि श्रीहरी आशीर्वाद देणार ते पाहुयात.
आजचे राशी भविष्य
मेष रास : भविष्यासाठी नियोजित केलेल्या गोष्टीला यश मिळेल. जवळच्या नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल. काही प्रश्न लवकरच निकालात निघतील. तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. मनात असलेल्या गोष्टीचे समाधानकारक उत्तर मिळेल. (Today Horoscope )
वृषभ रास : कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल. तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. वेळेचा सदुपयोग कराल. आज जवळचा प्रवास योग देखील आहे, त्यामुळे वाहने चालवताना काळजी घ्या. आज तुम्हाला सरकारी योजनेचे पैसे देखील मिळतील.
मिथुन रास : आज सुखद अनुभव येतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल. भावंडांसोबत नवीन काम सुरू करू शकता. तुमच्यावर महादेवाची विशेष कृपा असेल.तुमचे विवाहस्थळ जुळून येईल. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जोडीदार भेटेल. (Today Horoscope )
कर्क रास : आजचा दिवस धावपळीत जाईल. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक होईल. तुम्हाला बढती देखील मिळण्याची शक्यता आहे. मात्र, काही व्यक्ती तुम्हाला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे अशा व्यक्तीपासून सावध राहा.
सिंह रास : आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. दिवसाच्या शेवटी धार्मिक ठिकाणी भेट द्याल. (Today Horoscope )
News Title : Today Horoscope 14 November
महत्वाच्या बातम्या –
अभिषेकसोबत अफेरच्या चर्चांवर निम्रत कौर अखेर बोलली, व्हिडीओ तूफान व्हायरल
घटस्फोटाच्या 3 वर्षांनंतर समंथाचा मोठा खुलासा, म्हणाली…
‘एक नाही तर तब्बल 8 वेळा सलमानसोबत रात्र…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ
“निलंगा मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे”
शरद पवारांचे फोटो वापरू नका, स्वतंत्र पक्ष म्हणून..; अजित पवारांना हायकोर्टाचे निर्देश