Today Horoscope l मेष:- विनाकारण चिंता करू नका. आत्मविश्वासाच्या जोरावर मुसंडी माराल. सकारात्मकतेची जोड घ्याल. प्रेरणा देणार्या घटना घडतील. कार्यालयीन सहकारी मदत करतील. शुभ अंक ६, शुभ रंग नारंगी
वृषभ:- पैसे खर्च करताना सारासार विचार करावा. चिकाटी सोडून चालणार नाही. नवीन योजना मनात रुंजी घालतील. दिवसभर उत्साह जाणवेल. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. शुभ अंक ७, शुभ रंग काळा
मिथुन:- सहजीवनात आनंदाचे क्षण येतील. जोडीदाराचे नवीन रूप पहायला मिळेल. हलक्या कानाच्या लोकांपासून दूर राहावे. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. घरगुती खर्चाचे गणित मांडावे लागेल. शुभ अंक ३, शुभ रंग गुलाबी
कर्क:- व्यावसायिक स्थिती तणावपूर्ण राहील. हाती मिळालेला वेळ सत्कारणी लावावा. व्यायामाला कंटाळा करू नका. कामाचा आवाका समजून घ्यावा. शुभ अंक ५, शुभ रंग लाल
सिंह:- नातेवाईकांशी जवळीक वाढेल. घरातील वातावरण चांगले राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी पार पाडाल. शुभ अंक ८, शुभ रंग निळा
कन्या:- आर्थिक कामात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. कामातील रुचि वाढवावी लागेल. नातेवाईकांना नाराज करू नका. आवडते छंद जोपासाल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा लागेल. शुभ अंक २, शुभ रंग पिवळा
तूळ:- विनाकारण वाद उकरून काढू नका. मानसिक ताण नियंत्रणात ठेवा. ध्यानधारणा करावी. हिशोबात चोख रहा. वर्तन चांगले ठेवा. शुभ अंक ४, शुभ रंग पांढरा
वृश्चिक:- हातातील काम पूर्ण होईल. व्यवसायातील अनुभवी लोकांचा सल्ला घ्याल. मुलांचे वागणे स्वतंत्र वाटेल. आपल्या मनातील कल्पना आमलात आणाव्यात. जवळचा प्रवास घडेल. शुभ अंक ९, शुभ रंग हिरवा
Today Horoscope l धनू:- प्रयत्नातून यश मिळेल. कायदेशीर बाबी पाळाव्या लागतील. कामाची धांदल राहील. मानसिक शांतता जपावी. मेहनतीचे फळ मिळेल. दोन दिवसात नशीब चमकणार. शुभ अंक ४, शुभ रंग जांभळा
मकर:- इतरांची ढवळा ढवळ सहन करावी लागेल. मनाची द्विधावस्था टाळावी. आरोग्याची वेळेवर काळजी घ्या. कामे वेळेत हातावेगळी होतील. कामातून समाधान शोधाल. शुभ अंक ८, शुभ रंग पांढरा
कुंभ:- प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. भावंडांसाठी तजवीज कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. नवीन ओळखीचा फायदा होईल. शुभ अंक ६, शुभ रंग हिरवा
Today Horoscope l मीन:- मानसिक ताण कमी करण्यासाठी वाचन करावे. व्यावसायिक गुंतवणूक जपून करावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. दिवस संमिश्र जाईल. तिखट पदार्थांचा आस्वाद घ्याल. शुभ अंक १, शुभ रंग पिवळा
News Title – Today Horoscope
महत्त्वाच्या बातम्या
“अजित पवारांची जागा रोहित पवारांना घ्यायचीये, पण जयंत पाटील ठरतायेत अडचण”
ऐश्वर्या रायच्या अनेक गोष्टी पटत नाहीत, चारचौघात जया बच्चन मनातलं बोलून गेल्या!
जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; त्वचेवरही होतात वाईट परिणाम
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारने महिलेला उडवलं,24 तासांनंतरही गुन्हा दाखल नाही
सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी; नाराज छगन भुजबळ म्हणाले…