Today Horoscope | आज 15 नोव्हेंबररोजी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी आज रात्री 2 वाजून 59 मिनिटांपर्यंत राहील.याशिवाय आज ‘कार्तिक पौर्णिमा’ साजरी केली जाईल. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला ‘देव दिवाळी’ साजरी करतात अशी मान्यता आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी बरोबरच भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते. तर, आज कोणत्या राशीवर लक्ष्मी प्रसन्न होणार, ते पाहुयात. (Today Horoscope)
आजचे राशी भविष्य
मेष:- गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. न आवडणार्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराला खुश कराल. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल.
वृषभ:- अचानक खर्च समोर येऊ शकतात. आपल्या मतावर ठाम राहावे. आज अडकलेले पैसे परत मिळतील. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल. (Today Horoscope)
मिथुन:- आज चांगला धनलाभ होईल. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. जवळचे मित्र भेटतील.
कर्क:- कामाच्या ठिकाणी तुमचे आज कौतुक होईल. सहकार्याला मदत कराल. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल.
सिंह:- आज कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. स्वतःसाठी वेळ काढाल.
कन्या:- प्रत्येकवेळी स्वतःची चूक असेल, असं समजून माघार घेऊ नका. तुमच्या याच स्वभावाचा फायदा घेतला जाईल. त्यामुळे काय चूक आणि काय बरोबर याचा निर्णय घेऊन पाऊल टाका. तुमच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही योग्य बाजू निवडा.
तूळ:- जोडीदारासोबतचे वाद टोकाला जातील. नाते संपुष्टात येण्यासारखे वाद होतील. त्यामुळे आजचा दिवस विचारात जाईल. कामावर अधिक फोकस कराल. (Today Horoscope)
वृश्चिक:- कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.
धनू:- कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील. आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल. मुलांसोबत वेळ मजेत जाईल.आज वाहन खरेदीचा योग आहे.
मकर:- स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी. वाहन विषयक कामे पार पडतील. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे. (Today Horoscope)
कुंभ:- आज घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवास करताना काळजी घ्या. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. लहान भावंडे आपल्याला मदत करतील. एकाच गोष्टीचा सतत विचार करत बसू नका.
मीन:- व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. खाण्यापिण्याची हौस भागवाल. मनातील भावना व्यक्त कराल. तुमच्या भावनांना समजून घेतलेच जाईल, असं नाही. तुमचा हिरमोड होऊ शकतो. (Today Horoscope)
News Title : Today Horoscope 15 November
महत्वाच्या बातम्या –
संभाजी पाटील निलंगेकरांचा वंचित बहुजन आघाडीला झटका!
ऐश्वर्याला धोका दिल्याच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
आनंदवार्ता! लग्नसराईत सोनं झालं स्वस्त; 1 ग्रॅमसाठी मोजा फक्त ‘इतके’ रुपये
अजित पवार गटाला वडगाव शेरीत मोठा धक्का, टिंगरेंसह ‘या’ बड्या नेत्यांनी तुतारी फुंकली
“येत्या सहा महिन्यात मोदींचं सरकार पडणार”; खळबळजनक दावा समोर