Today Horoscope 16 January 2025 | आज 16 जानेवारीरोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी पहाटे 4 वाजून 7 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आश्लेषा नक्षत्र रात्री 11 वाजून 17 मिनिटांपर्यंत जागृत असेल. तर राहू काळ 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 3 वाजेपर्यंत असणार आहे.आज गुरुवारी स्वामी कोणत्या राशीवर आपली विशेष कृपा ठेवणार, ते पाहुयात. (Today Horoscope 16 January 2025 )
आजचे राशीभविष्य-
मेष रास : शिक्षण संबंधी कामात आज तुम्हाला नव्या संधी मिळतील. आजचा दिवस नवीन कल्पनांना वाव देणारा असेल. आजचा शुभ रंग- लाल आणि पिवळा
वृषभ रास : घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीचे व्यवहार फायद्याचे ठरतील. आजचा शुभ रंग- पांढरा आणि निळा
मिथुन रास : कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होत असतील तर शांत राहा. तुमची प्रगती होईल. जोडीदाराचा सल्ला घ्या. आजचा शुभ रंग- पांढरा आणि निळा
कर्क रास : नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर चांगली संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. काही कर्ज असेल तर ते फेडण्यात यशस्वी व्हाल. आजचा शुभ रंग- लाल आणि केशरी
सिंह रास : लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांना कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल. आज तुम्हाला भाग्याची देखील साथ मिळेल. आजचा शुभ रंग- लाल आणि केशरी
कन्या रास : स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस. . गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. आजचा शुभ रंग- पिवळा आणि नारंगी (Today Horoscope 16 January 2025 )
तूळ रास : नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. प्रिय व्यक्तीला भेटाल.रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आजचा शुभ रंग- लाल आणि पांढरा
वृश्चिक : भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. आजचा शुभ रंग- पिवळा आणि केशरी
धनू : आहाराचे पथ्य न चुकता पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. आजचा शुभ रंग- पिवळा आणि लाल
मकर : नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. आज धार्मिक ठिकाणी भेट द्याल. आजचा शुभ रंग- पांढरा आणि जांभळा
कुंभ रास : आज तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. भावा-बहिणींचा सल्ला अवश्य घ्या. तुमचे नाते सुधारेल. आर्थिक दृष्टीकोनातून केलेले प्रयत्न नक्कीच यश देतील. आजचा शुभ रंग- निळा आणि हिरवा (Today Horoscope 16 January 2025 )
मीन रास : अति घाई करू नये. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. आज कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. आजचा शुभ रंग- हिरवा आणि केशरी
News Title : Today Horoscope 16 January 2025
महत्वाच्या बातम्या-
वाल्मीक कराड बद्दल कोर्टात 7 खळबळजनक दावे, एसआयटीच्या दाव्यांनी कोर्ट सुद्धा हादरलं
…तो एक पुरावा अन् वाल्मिक कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी!
वाल्मिक कराड हत्येच्या दिवशी आरोपींसोबत 10 मिनिटे बोलला! सगळं सत्य आलं समोर
वाल्मिक कराड मुंडेंकडे घरगडी म्हणून होता, मग एवढी संपत्ती कशी आली?
केज पोलीस ठाण्याबाहेर ब्लॅक गाडीच्या घिरट्या, नेमकं प्रकरण काय?