Today Horoscope | आज 19 नोव्हेंबररोजी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी मंगळवारी संध्याकाळी 5 वाजून 29 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज आर्द्रा नक्षत्रा दुपारी 2 वाजून 56 मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. आज राहू काळ 3 वाजता सुरु होईल ते 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय आज सूर्य अनुराधा नक्षत्रात प्रवेश करेल. याचा फायदा कोणत्या राशीला होणार ते पाहुयात. (Today Horoscope )
आजचे राशी भविष्य
मेष:- मन विचलित करणाऱ्या घटना घडतील. काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते.
वृषभ:- नवीन काम अंगावर येऊ शकते. विद्यार्थी वर्ग खुश असेल. आपली क्षमता लक्षात घ्यावी. काम करण्याचा आज प्रचंड कंटाळा येईल.
मिथुन:- कामात सकारात्मक बदल संभवतात. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका. अतिउत्साह तुम्हालाच भारी पडेल. त्यामुळे होईल तितके काम करा.
कर्क:- तुम्हाला ग्रहमानाची साथ लाभेल. सरकारी कामाचे पैसे मिळतील. विवाहासाठी सरकारी सेवेतील स्थळ येईल. त्यामुळे आज आनंदी असाल. (Today Horoscope )
सिंह:- अपेक्षित उत्तर हाती येईल. लहान प्रवास घडेल. कामात अनुकूलता येईल. तुमच्यातील कलेला वाव मिळेल.
कन्या:- नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. सहकारी वर्ग मदत करेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. आजचा दिवस थकवणारा असेल.
तूळ:- आयुष्यात मोठे बदल घडतील, असा निर्णय घ्याल. आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची दाट संभावना आहे. तुमच्या प्रेमविवाहाला कुटुंबाची संमती मिळेल.
वृश्चिक:- एखादी नवीन संधी चालून येईल. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखादी गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका. एखादा वाद संपुष्टात येईल. (Today Horoscope )
धनू:- घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल. तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदी जाईल.
मकर:- अति धाडस दाखवू नका. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. जुगार खेळतांना सावध राहावे. जुनी कामे आधी मार्गी लावावीत. तुमच्या बॉससोबत वाद होऊ शकतात. त्यामुळे बोलताना तारतम्य बाळगा. वाईट आणि कटू शब्द बोलू नका.
कुंभ:- आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल. आजचा दिवस प्रसन्न आणि आनंदी जाईल. (Today Horoscope )
मीन:- आज लांबचा प्रवास योग आहे. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्या. आज तुम्हाला जवळच्या व्यक्तीशी गाठ पडेल. यामुळे खुश असाल. वैवाहिक आयुष्य आनंदी जगाल.
News Title : Today Horoscope 19 November
महत्वाच्या बातम्या –
राजकारण गाजवणाऱ्या बड्या नेत्याने राजकीय संन्यासाची केली घोषणा!
रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी; शरद पवारांनी जाहीरच करून टाकलं
चंद्रकांत पाटलांचं कोथरूडकरांना आवाहन, म्हणाले…
नवऱ्याकडून छळ झाला सांगताना भाजप उमेदवाराला रडू कोसळले?
मुख्यमंत्र्यांनी 74 कोटीचा घोटाळा केला; कोणी केला आरोप?