आज या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता

Today Horoscope l मेष:- शांत राहून कामे करावीत. घरात बौद्धिक चर्चा होईल. नोकरीत बढतीचे योग आहेत. कार्यालयीन वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. शुभ अंक ५, शुभ रंग हिरवा

वृषभ:- घरासाठी खर्च करण्याची तयारी ठेवा. बोलण्यातून इतरांची मने सांभाळून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. कामात गतीमानता येईल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल. शुभ अंक ९, शुभ रंग लाल

मिथुन:- उत्तम गुंतवणूक कराल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्याल. मित्रांशी मतभेदाची शक्यता. कामे वेळेत पूर्ण होतील. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल. शुभ अंक १, शुभ रंग हिरवा

कर्क:- अचानक धनलाभाची शक्यता. मानसिक संतुलन सांभाळा. मुलांकडून चांगले सहकार्य मिळेल. नवीन माहिती शोधण्यात वेळ घालवाल. वाईट विचार दूर ठेवा. शुभ अंक ९, शुभ रंग पिवळा

सिंह:- ठरवलेल्या गोष्टी पुढे ढकलू नका. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. घरात मंगल कार्याच्या योजना आखल्या जातील. मनोबल वृद्धिंगत होईल. मानसिक शांतता व प्रसन्नता वाढेल. शुभ अंक ६, शुभ रंग नारंगी

कन्या:- मनातील इच्छेवर ठाम राहाल. घरात शांतता नांदेल. कामातून मनाजोगे समाधान मिळेल. मुलांना नवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करा. प्रकृतीची हेळसांड करू नका. धनलाभ होण्याची शक्यता. शुभ अंक ८, शुभ रंग पोपटी

तूळ:- दिवस मजेत जाईल. जुगाराची हौस भागवाल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे फार लक्ष देऊ नका. घरगुती गोष्टीत तडजोड करावी लागेल. कामाच्या ठिकाणी शब्दाला मान मिळेल. शुभ अंक ५, शुभ रंग काळा

Today Horoscope l वृश्चिक:- शांत राहून कामाची पावती मिळवा. घरगुती खर्चाचा पुनर्विचार करा. व्यायामाची आवड लावून घ्या. मुलांवरील खर्च वाढू शकतो. हातातील कामे लवकर मार्गी लागतील. शुभ अंक 1, शुभ रंग निळा

धनू:- धार्मिक ग्रंथांचे वाचन वाढेल. चटकन नाराजी दर्शवू नका. गुंतवणुकीला चांगला वाव आहे. प्रवासाचे योग संभवतात. वरिष्ठांची मर्जी राखावी. शुभ अंक १, शुभ रंग हिरवा

मकर:- आवडी बाबत अधिक दक्ष राहाल. आरोग्याविषयी हलगर्जीपणा करू नका. खाद्य पदार्थांची रेलचेल राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखादे परिवर्तन चांगले असेल. शुभ अंक ७, शुभ रंग पोपटी

Today Horoscope l कुंभ:- दिवस आनंदात घालवाल. जोमाने कामे करत राहाल. भागिदारीतून चांगले उत्पन्न मिळेल. योजलेल्या गोष्टी सुरळीत पार पडतील. क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालू नका. शुभ अंक ९, शुभ रंग गुलाबी

मीन:- मन शांत ठेवून निर्णय घ्या. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. फार विचार करत बसू नका. चटकन आपले मत मांडू नका. बचतीच्या योजना आमलात आणा. शुभ अंक ३, शुभ रंग नारंगी

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकार पुन्हा आल्यास ‘हे’ शेअर्स बनणार रॉकेट; पैसे होणार डबल

‘…म्हणून हिंदुंनी 5-5 मुलांना जन्म द्यायला हवा’; देवकीनंदन यांचं वक्तव्य चर्चेत

‘येत्या 4 जून रोजी…’; मनोज जरांगे यांची नवी घोषणा

‘…नाहीतर मी मुख्यमंत्री झालो असतो’; छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे हादरलं! बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षाच्या मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडलं