Today Horoscope | आज 23 नोव्हेंबर, शनिवारी कार्तिक कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी शनिवारी संध्याकाळी 7 वाजून 58 मिनिटांपर्यंत चालेल. त्यानंतर 11 वाजून 43 मिनिटांपर्यंत इंद्र योग राहील. याशिवाय शनिवारी कालभैरव जयंती आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असते. मात्र कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कालभैरवाची जयंती असते. (Today Horoscope )
या वर्षी, कालभैरव जयंती आज 23 नोव्हेंबर, शनिवारी येत आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज विधानसभेचा निकाल लागणार आहे. आजच्या या दिनी कोणत्या राशीच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळणार, ते पाहुयात.
आजचे राशीभविष्य
मेष:- व्यावसायिक स्तरावर एखादी चांगली घटना घडेल. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. एखादी दिलासादायक घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल.
वृषभ:- उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. जवळचे मित्र भेटतील. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. (Today Horoscope )
मिथुन:- या राशीच्या व्यक्तींना आज राजकारणात मोठं यश मिळणार आहे. तुम्हाला मान-सन्मान आणि मोठं पद मिळेल. तुमचा आजचा दिवस कायम स्मरणात राहण्यासारखा जाईल.
कर्क:- आजचा दिवस अत्यंत थकवणारा असणार आहे. आज तुमची प्रचंड धावपळ होईल. तुम्हाला हित शत्रूपासून जपून राहावे लागणार आहे.
सिंह:- या राशीच्या व्यक्तींना आज भविष्याच्या दृष्टीने मोठ्या ऑफर्स मिळतील. ऐनवेळेवर तुम्हाला धोका देखील मिळू शकतो. जवळचे व्यक्ती साथ सोडू शकतात. (Today Horoscope )
कन्या:- कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. जोडीदाराशी मतभेद टाळा. धावपळीचा दिवस. मात्र धावपळ लाभदायक ठरेल.
तूळ:- आपल्याच मुद्यावर अडून राहाल. मनातील संभ्रम दूर सारावा. आज तुमच्यावर शनिदेव प्रसन्न राहतील. तुम्हाला आज प्रत्येक कार्यात यश मिळेल.
वृश्चिक:- गरज नसेल तर फार बोलू नका. सामाजिक कामात मदत नोंदवाल. कर्तुत्वाला वाव मिळेल. बौद्धिक ताण जाणवेल.
धनू:- धार्मिक कामासाठी खर्च कराल. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. जुनी येणी प्राप्त होतील. कौटुंबिक जबाबदार्या पार पाडाल. (Today Horoscope )
मकर:- कामावर अधिक निष्ठा ठेवावी. कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुम्हाला आज नवीन संधी प्राप्त होईल, त्याचा फायदा घ्या.
कुंभ:- समोरील संधीचा लाभ घ्यावा. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेऊ नका. आज कामाचा प्रचंड ताण असेल. संपूर्ण दिवस कामात जाईल. दिवसाच्या शेवटी आनंदवार्ता मिळेल.
मीन :- आज तुम्हाला राजकीय क्षेत्रात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा विजय मिळेल. आज तुमच्यावर शनिदेव विशेष कृपा ठेवतील. (Today Horoscope )
News Title : Today Horoscope 23 November
महत्वाच्या बातम्या –
मतदान होताचं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! CNG च्या दरात वाढ
योग्य न्याय मिळाला नाही!, मुंबईतील बड्या भाजप नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
सत्तेसाठी खटपट सुरु; निकालापूर्वीचं महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला
…तर मनोज जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही
‘राज’पुत्र अमित ठाकरे आमदार बनणार?, माहीममध्ये यंदा कोण मारणार बाजी?