Today Horoscope | आज 25 नोव्हेंबर, सोमवारी कार्तिक कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी रात्री 1 वाजून 02 मिनिटांपर्यंत राहील. तसेच दुपारी 1 वाजून 12 मिनिटांपर्यंत विश्व कुंभ योग जुळून येईल. तर नवीन आठवडा उत्तरा फाल्गुनी नक्षत्राने सुरु होणार आहे. सोमवारचा दिवस हा भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आला आहे. तर भोलेनाथांची कृपा कोणत्या राशीवर असणार, ते पाहुयात. (Today Horoscope)
आजचे राशी भविष्य
मिथुन:- जुनी उधारी वसूल होईल. घरातील वातावरण चांगले राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची चांगली मदत होईल. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. विद्यार्थी वर्गाला खेळात यश मिळेल. महिलांची आज फार धावपळ होईल.
सिंह:- व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा घालवाल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रमोशन होईल. तुमच्या पगारात वाढ होईल. आजचा दिवस आनंदी जाईल. घरी विवाहासाठी चर्चा केली जाईल. आज महादेवाच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. (Today Horoscope)
वृश्चिक:- आज या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणुकीला चांगला काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. कामातील समस्या दूर होतील. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल. (Today Horoscope)
News Title – Today Horoscope 25 November
महत्त्वाच्या बातम्या
‘महाराष्ट्र हरलास तू…’, तेजस्विनी पंडीतने राज ठाकरेंसाठी केलेली ‘ती’ पोस्ट तूफान व्हायरल!
अजित पवारांना मिळालेल्या यशामागचं कारण शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले…
पराभवानंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘मी आता काय…’
“आयुष्यात छान गोष्ट घडली…”, प्राजक्ताने व्हिडीओ शेअर करत दिली गूड न्यूज
महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाची स्थापना होणार? कोण करणार