आज ‘या’ राशींवर स्वामींची असणार अपार कृपा, दुःख दूर होऊन सुखाचे दिवस येणार!

Today Horoscope 28 November

Today Horoscope | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते. (Today Horoscope )

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

त्यानुसार आज 28 नोव्हेंबरचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल ते पाहुयात. आज गुरुवारी, कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी शुक्रवारी सकाळी 8 वाजून 41 मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय गुरुवारी प्रदोष व्रत सुद्धा असणार आहे. तर राहू काळ 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 3 वाजेपर्यंत असेल.

आजचे राशीभविष्य

मेष:- धार्मिक कार्यात मग्न व्हाल. नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी उत्सुक असाल. अनेक प्रश्नांची उकल काढता येईल. स्वत:साठी वेळ काढावा. तज्ञ लोकांशी संपर्क साधावा.

वृषभ:- आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. स्त्रीवर्गाशी जरा जपून वागावे.कामाच्या ठिकाणी वाद होण्याची संभावना आहे.

मिथुन:- नवविवाहितांसाठी आजचा दिवस आनंदी जाईल. व्यावसायिकांना चांगला फायदा मिळेल. वरिष्ठांकडून दाद मिळेल. चारचौघात कौतुक केले जाईल. आज तुमच्यावर स्वामींची विशेष कृपा असेल.

कर्क:- विरोधकांपासून सावध राहावे. छुपे शत्रू त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.

सिंह:- व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस फायद्याचा असणार आहे. आज तुम्हाला अचानक नवीन संधी चालून येईल. विद्यार्थ्यांना नवीन आव्हान स्वीकारता येईल. तुमची एकाग्रता वाढेल. (Today Horoscope)

News Title : Today Horoscope 28 November

महत्वाच्या बातम्या –

‘डायरेक्टर कट म्हटला तरी तो करतच राहिला….’; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

‘माझा पक्ष, माझे वडिल….’; पार्थ पवारांचा अमोल मिटकरींना थेट इशारा

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला का?

“लोकप्रियता मिळवण्यासाठी मी…”; पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

‘मी मोदी आणि शाह यांना फोनवर सांगितलं…’; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .