Today Horoscope | आज 28 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी सोमवारी सकाळी 7 वाजून 51 मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होईल. तसेच आज इंद्र योग जुळून येईल आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र दुपारी 3 वाजून 24 मिनिटांपर्यंत जागृत असेल. (Today Horoscope )
याशिवाय आज गोवत्स द्वादशी व्रतही पाळण्यात येणार आहे. दिवाळी या प्रमुख आणि सर्वात मोठ्या सणाची सुरुवात ही वसुबारसच्या सणाने होते. याला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हणतात. आजच्या या शुभ दिनी कोणत्या राशीला फायदा होणार, ते पाहुयात.
आजचे राशीभविष्य
मेष रास : आजचा दिवस तुमच्यासाठी विचारशील असेल. कर्ज घेण्याचा विचार आत्ता करू नका. आज नशीबाची चांगली साथ मिळेल. आज शुभवार्ता ऐकायला मिळेल.
वृषभ रास : आज तुम्ही आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी मदत करेल, असा मोठा निर्णय घ्याल. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. आज समारंभासाठी आमंत्रण येईल. आज धावपळीमुळे थकवा जाणवेल.
मिथुन रास : आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. देवावरील विश्वास दृढ होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील. (Today Horoscope )
कर्क रास : आजचा दिवस चांगला जाईल. मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. मुलांवरील विश्वास दृढ होईल. मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल. आजचा दिवस हा खरेदीत जाईल. आवडत्या वस्तूंची खरेदी कराल. यामुळे आनंदी राहाल.
सिंह रास : आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. डोळ्यांशी निगडीत अडचण दूर होईल. इतरांशी असणारे संबंध जपावेत. आज जुन्या मित्रांची भेट होईल.
कन्या रास : आजचा दिवस सुखद असेल. हातातील कामे न डगमगता कराल.आज कामाच्या ठिकाणी तुमची खूप चिडचिड होऊ शकते. तुमच्या चांगल्या स्वभावाचा लोक फायदा घेतील, कुणाच्या मधुर वाणीत अडकू नका.
तूळ रास : आजचा दिवस शुभ असेल. तुम्हाला मनाजोगी फळे मिळतील. नात्यात गोडवा निर्माण होईल. इतरांच्या आनंदाचा विचार कराल. आर्थिक स्थिती सुधारेल.
वृश्चिक रास : संयमाने सर्व गोष्टी साध्य करता येतील. अडकलेली कार्यालयीन कामे पूर्ण होतील. आजचा दिवस धावपळीमध्ये जाईल. दिवसाच्या शेवटी आनंदवार्ता कानी पडेल.
धनू रास : दिवस चांगला जाईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. आवड जोपासता येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्याच्या समस्या दूर होतील.
मकर रास : मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. नावडते लोक सामोरे येतील. नातेवाईक तुमचा आदर करतील. सहकारी तुमच्या मताशी सहमत होतील. (Today Horoscope )
कुंभ रास : आज तुम्हाला परएक कामात नशीबाची साथ मिळेल. केलेला खर्च फायदेशीर ठरेल. कोणावरही अति विश्वास ठेवू नका.जवळचा प्रवास घडेल.
मीन रास : मुलांशी मतभेद संभवतात. आनंदी लोकांचा सहवास लाभेल. सामाजिक सन्मानात वाढ होईल. तुमचे मनोबल वाढेल. राजकारणात तुम्हाला यश मिळेल.
News Title – Today Horoscope 28 October
महत्त्वाच्या बातम्या-
‘विमान क्रॅश झाल्याने काजोलचा मृत्यू?’; निधनाच्या बातमीने उडालेली खळबळ
लेकासाठी बाप उतरला मैदानात; सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात दिसणार
निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका!
‘या’ प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा मित्रासोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल!
शरद पवार गटाची अंतिम यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरुद्ध ‘हा’ नेता लढणार