‘या’ तीन राशींच्या कुंडलीत होणार मोठे बदल

Today Horoscope l मेष:- जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. दिवस उत्तम रित्या व्यतीत कराल. व्यावसायिक क्षेत्रात ठाम रहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ६

वृषभ:- अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. अती विचार करू नका. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्यावी. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ३

मिथुन:- कामाच्या शैलीत बदल करावा लागेल. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केन्द्रित करावे. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. स्वभावात करारीपणा बाळगावा. बोलताना तारतम्य बाळगावे. शुभ रंग लाल, शुभ अंक ८

कर्क:- राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना फलदायी दिवस. घरासाठी आवर्जून काही गोष्टी कराल. खर्चाचा आकडा वाढता राहील. अधिकारी वर्गाला नाराज करू नका. दिवस धावपळीत जाईल. कुंडलीत शुभ योग आहेत. शुभ रंग पिवळा, शुभ अंक २

सिंह:- विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. लोकांचा विश्वास संपादन कराल. संपूर्ण विचार केल्याशिवाय वचन देऊ नका. कलेतून चांगला लाभ होईल. नवीन प्रकल्प हाती घ्याल. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ७

कन्या:- कौटुंबिक वातावरणात अधिक रमाल. समस्यांचे निराकरण होईल. लोकांकडून चांगल्या कामाची प्रशंसा होईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. रचनात्मक कामे करता येतील. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ९

Today Horoscope l तूळ:- आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. भविष्यातील योजनांवर काम चालू करा. मैत्रीचे नवीन प्रस्ताव येतील. शुभ रंग निळा, शुभ अंक २

वृश्चिक:- दिवस धावपळीत जाईल. परंतु केलेल्या कामातून समाधान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. अचानकपणे धनलाभ संभवतो शुभ रंग विटकरी, शुभ अंक ४

धनू:- कार्यालयीन ठिकाणी उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील. झोपेची तक्रार जाणवेल. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ८

मकर:- दिवसाची सुरवात उत्साहात कराल. प्रलंबित कामे मार्गी लावाल. कामा व्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये. भावंडांशी मतभेद संभवतात. मानसिक शांतता जपावी. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक १

कुंभ:- विरोधकांकडे दुर्लक्ष कराल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. अती तिखट पदार्थ खाऊ नयेत. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आपल्यातील आक्रमकतेला आवर घालावा. विवाहाचा योग आहे. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ३

Today Horoscope l मीन:- मनातील गैरसमज दूर करावेत. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न यश देतील. आपल्याच मतावर अडून राहू नका. मानसिक समतोल साधावा. शुभ रंग काळा, शुभ अंक ६

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश?, छगन भुजबळांची संतापजनक प्रतिक्रिया; म्हणाले..

सेल्फीच्या नादात नवविवाहितेने गमावला जीव; किल्ल्यावरून थेट..

“मराठीत बोलली म्हणून थेट धमकी..”; अभिनेत्रीने सांगितला लोकलमधील धक्कादायक अनुभव

“पुणे उद्ध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही”; धंगेकरांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापलं

पुणे पोलिसांकडून महिन्याला किती रुपयांची वसुली?, रवींद्र धंगेकरांनी थेट यादीच दिली