या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी

Today Horoscope l मेष:- काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. मन:स्वाथ्य कायम ठेवून कार्य करावे. आततायीपणे वागून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देऊ नका. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक ७, शुभ रंग हिरवा

वृषभ:- खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मित्रांकडून अनपेक्षित टोला बसू शकतो. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. जुने ग्रंथ हाताळले जातील. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. शुभ अंक १, शुभ रंग लाल

मिथुन:- स्वत:च्या विचारांना स्थिर ठेवा. जोडीदाराचा सल्ला ऐकावा. जुन्या मित्रांशी फोनवरून संपर्क होण्याची दाट शक्यता. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. आपल्या योजना गुप्त ठेवाल. शुभ अंक २, शुभ रंग नारंगी

कर्क:- घरातील जबाबदारी पेलताना दमणूक होईल. आहारात पथ्ये पाळावीत. काही गोष्टींची गुप्तता पाळाल. ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य घ्यावे. कार्यक्षेत्रात परिवर्तन घडून येईल. शुभ अंक ५, शुभ रंग काळा

सिंह:- नवीन कार्याला चालना मिळेल. तुमच्या शब्दाला मान लाभेल. बौद्धिक चुणूक दाखवाल. आपल्याच मतावर ठाम राहाल. दिवस आनंदात जाईल. शुभ अंक ३, शुभ रंग पोपटी

Today Horoscope l कन्या:- घरातील बरीच कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी सामंजस्याने वागावे. मनातील निराशा दूर करावी. तुमच्यातील कलेला कौतुकाची थाप मिळेल. क्षुल्लक अपेक्षाभंगाने खचून जाऊ नका. शुभ अंक ९, शुभ रंग निळा

तूळ:- हातून चांगले काम होईल. घरामध्ये शांत राहावे. महत्त्वाचे निर्णय गांभीर्याने घ्यावेत. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. कामाची नवीन जबाबदारी अंगावर पडणार आहे. शुभ अंक १, शुभ रंग नारंगी

वृश्चिक:- कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. देणी फेडता येतील. तुमच्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. शुभ अंक ३, शुभ रंग काळा

धनू:- हातून चांगली कामे होतील. गरज नसेल तर खर्च टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास वाढीस लागेल. नियोजनाने कामे सुलभ होतील. आरोग्याची काळजी घ्यावी. शुभ अंक ९, शुभ रंग लाल

मकर:- अतिविचार करू नका. धार्मिक गोष्टीत मन रमवावे. कौटुंबिक गोष्टी सबुरीने घ्याव्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मुलांबरोबर संवाद साधावा. शुभ अंक ४, शुभ रंग पोपटी

कुंभ:- मुलांबरोबर खेळ खेळावेत. प्रेमसंबंध अधिक दृढ करावेत. ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करावे. भावंडांशी संवाद साधावा. कामाचा जोम वाढेल. शुभ अंक ७, शुभ रंग हिरवा

Today Horoscope l मीन:- घरातील वातावरण शांततामय ठेवा. अधिकार बेताचाच वापरा. बोलताना तोल जाणार नाही याची काळजी घ्या. कामाचा विस्तार वाढवण्याचे ठरवाल. कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका. शुभ अंक २, शुभ रंग पिवळा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आमदारांनी अजितदादांचं टेंशन वाढवलं

मुख्यमंत्री पदाबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य!

रोज एक डाळिंब खाण्याचे ‘इतके’ फायदे ऐकून तुम्हीही चकित व्हाल!

“ओवैसींची खासदारकी रद्द करा”, नवनीत राणांचं राष्ट्रपतींना पत्र

“पंकजा मुंडेंना धोका दिला…”; शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांच्या ऑडिओ क्लिपने बीडमध्ये खळबळ