आज विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

Today horoscope 3 December 2024

Today Horoscope | आज मंगळवार, 3 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत चालेल. त्यानंतर तृतीया तिथी सुरू होईल. तर आज राहू काळ 1 वाजता सुरु होईल ते 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. (Today Horoscope) this

याशिवाय 3 डिसेंबरला विनायक चतुर्थी आहे. आजच्या दिवशी बाप्पा कोणत्या राशींवर आपली कृपादृष्टी ठेवणार ते पाहूयात.

आजचे राशीभविष्य

मेष:- आध्यात्मिक प्रगती चांगली करता येईल. मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.

वृषभ:- नवीन मित्र जोडता येतील. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. घरातील उपयोगी वस्तूंसाठी आज खरेदी कराल.आज जवळचा प्रवासयोग देखील आहे (Today Horoscope)

मिथुन:- व्यवसायात चांगला लाभ मिळेल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. वडीलांकडून मदत घेता येईल. आज कामाच्या ठिकाणी तुमची चिडचिड होऊ शकते. त्यामुळे डोके शांत ठेवून काम करा. दिवसाच्या शेवटी शुभवार्ता ऐकायला मिळेल.

कर्क:- आत्मविश्वासाने वागाल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे.

सिंह:- एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो. धार्मिक स्थळाला भेट देता येईल. आज तुमच्यावर गणपती बाप्पाची विशेष कृपा असेल. तुमचे गृह कर्ज आज मंजूर होऊ शकते. त्यामुळे प्रसन्न आणि आनंदी राहाल. (Today Horoscope)

कन्या:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.जोडीदारासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल.

तूळ:- अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते. आज वाहन खरेदीचा योग आहे. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर फिरायला जायचा देखील प्लॅन ठरेल.

वृश्चिक:- मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आपले आवडते छंद जोपासा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

धनू:- कौटुंबिक सौख्यात दिवस घालवाल. मानसिक समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. आरोग्याच्या समस्या दूर  होतील. तुमच्यावर बाप्पाची विशेष कृपा असेल. तुमचा विवाह योग देखील जुळून येईल. तुम्हाला आवडीप्रमाणे विवाह स्थळ चालून येईल. (Today Horoscope)

मकर:- लहान प्रवास घडेल. कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल. विद्यार्थ्यांना नवीन संधी चालून  येतील. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. तुम्हाला नवीन व्यासपीठ प्राप्त होईल.

कुंभ:- कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. चोरांपासून सावध राहावे. जमीनीचे व्यवहार आज टाळावेत. सासरच्या मंडळी कडून तुम्हाला आज मोठी भेटवस्तू मिळण्याची संभावना आहे.

मीन:- दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक प्रश्न सुटेल.भविष्याच्या दृष्टीने गंभीर विचारात मग्न व्हाल. आजचा दिवस थोडा ताण-तणावातच जाऊ शकतो. मात्र दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. (Today Horoscope)

“पैशांसाठी मी लोकांसोबत…”, ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीने स्वतः दिली देहविक्रीची कबुली!

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .