आज नरक चतुर्दशी, कुणाचं नशीब सोन्यासारखं चमकणार?; वाचा राशीभविष्य

Today Horoscope 31 October 

Today Horoscope | आज 31 ऑक्टोबररोजी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. आजच्याच दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. या खास दिवशी सुगंधित उटणे लावून स्नान करण्यात येते. भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून सुमारे 16 हजार स्त्रियांची मुक्तता केली होती. त्यामुळे आजच्या दिनी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. (Today Horoscope)

यासोबतच या दिवशी लोक यमदेवासाठी दिवा लावून कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. नरक चतुर्दशीला देवी लक्ष्मी, यमराज, भगवान श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, भगवान हनुमान आणि भगवान विष्णू यांच्या वामन स्वरुपाची पूजा केली जाते. प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष तिथीला नरक चतुर्दशी साजरी करतात. तर, आजच्या या दिवशी कोणत्या राशीच्या आयुष्यात सुख-समृद्धी येणार ते पाहूयात. (Today Horoscope)

आजचे राशी भविष्य

मेष:- आज तुमचा प्रभाव वाढीस लागेल. तुमची लोकप्रियता वाढीस लागेल. वाहन खरेदीचे काम पुढे सरकेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती कराल.

वृषभ:- तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतील. सामाजिक वर्तुळ वाढेल. आज तुम्ही दिवाळीच्या फराळावर ताव माराल. कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल. (Today Horoscope)

मिथुन:- आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे मिळतील. विद्यार्थ्यांनी संयम राखावा. एकाग्रतेने कामे करावीत.

कर्क:- भावंडांसोबत दिवाळी साजरी कराल. इतरांना आनंदात सहभागी करून घ्याल. भौतिक गोष्टींवर खर्च कराल. व्यवसायात अधिक व्यस्त राहाल. (Today Horoscope)

सिंह:- आत्मविश्वासाच्या बळावर कामे कराल, त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. जुनी रखडलेली कामे पूर्ण कराल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

कन्या:- आजचा दिवस चांगला जाईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मुलांकडून आनंद वार्ता मिळेल.

तूळ:- नवीन गोष्टीबद्दल तुम्हाला आकर्षण निर्माण होईल. तुमचे शब्द खरे ठरतील. नवीन कामासाठी मार्ग मोकळा होईल. जुन्या मित्रांची गाठ पडेल. जुन्या आठवणीत रमून जाल.

वृश्चिक:- आजचा दिवस खर्च करणारा असेल. मुलांकडून मनाजोगी कामे पार पडतील. कौटुंबिक कामे सुरळीत पार पडतील. आवडत्या व्यक्तीची गाठ पडेल. (Today Horoscope)

News Title –  Today Horoscope 31 October 

महत्त्वाच्या बातम्या-

2024 मध्ये ‘या’ पक्षाचा असणार मुख्यमंत्री; राज ठाकरेंचं भाकीत

अमित शाह महाराष्ट्रात जादूची कांडी फिरवणार? ‘इतक्या’ सभा घेणार

मनसेला निवडणूक आयोगाकडून सर्वात मोठा धक्का!

पालघरमध्ये मोठा राजकीय ड्रामा, आता संपूर्ण वनगा कुटुंब बेपत्ता

नरक चतुर्दशीला करा ‘हे’ काम, जीवनात सुख-समृद्धीसह येईल भरभराट!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .