Today Horoscope | आज 4 मार्च 2025 रोजी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी दुपारी 3:17 पर्यंत राहणार आहे. या दिवशी दुपारी 2:07 पर्यंत इंद्र योगाचा प्रभाव राहील, तर भरणी नक्षत्र रात्री 2:38 पर्यंत प्रभावी असेल. संध्याकाळी 6:40 वाजता सूर्य पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या ग्रहस्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. चला, जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे. (Today Horoscope)
आजचे राशीभविष्य-
मेष : मेष राशीच्या लोकांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढल्याचे जाणवेल आणि नवीन ओळखी निर्माण होतील.
वृषभ : या राशीच्या जातकांनी प्रवास करताना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
मिथुन : या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांसाठी आर्थिक नियोजन करण्याची गरज भासेल.
कर्क : या राशीच्या व्यक्तींना घरातील ज्येष्ठांची मदत मिळेल आणि वाहनसुखाचा लाभ होईल.
सिंह : या राशीच्या जातकांना दूरच्या प्रवासाची संधी मिळू शकते.
कन्या: तर कन्या राशीच्या लोकांना जुन्या कामातून आर्थिक लाभ संभवतो.
तूळ : या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ जबाबदारी पार पाडण्याचा असून प्रशासकीय भूमिका अधिक प्रभावी ठरेल.
वृश्चिक : या राशीच्या लोकांनी अध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष द्यावे आणि ढोंगी व्यक्तींपासून दूर राहावे.
धनू : या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, मात्र मित्रांशी मतभेद टाळावेत.
मकर : या राशीच्या लोकांना जोडीदाराच्या मदतीने त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळेल.
कुंभ : या राशीच्या व्यक्तींनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे आणि कामातील दिरंगाई टाळावी.
मीन : या राशीच्या जातकांनी भावनेच्या भरात वाहून जाऊ नये आणि सतत काळजी करण्याऐवजी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.
News Title : Today Horoscope 4 March 2025