आज शनीचा उत्तरभाद्रपद नक्षत्र ‘या’ राशींना करणार धनवान!

Today Horoscope 6 January 2025

Today Horoscope 6 January 2025 | आज 6 जानेवारीरोजी पौष शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आणि सोमवार आहे. ही सप्तमी तिथी सोमवारी सायंकाळी 6 वाजून 24 मिनिटांपर्यंत राहील. तसेच उत्तर भाद्रपद नक्षत्र सोमवारी 7 वाजून 7 वाजेपर्यंत राहील. उत्तरा भाद्रपद हे आकाशात स्थित 27 नक्षत्रांपैकी 26 वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी शनिदेव आहे. तर, आजचा उत्तर भाद्रपद नक्षत्र कोणत्या राशीसाठी शुभ ठरणार ते पाहुयात. (Today Horoscope 6 January 2025)

आजचे राशीभविष्य-

मेष:- मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. व्यवसायात गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा.कौटुंबिक कार्यात तुमचा मान-सन्मान वाढेल. आजचा दिवस कामातच जाईल. दिवसाच्या शेवटी समाधान वाटेल.

वृषभ:- कामाच्या ठिकाणी अति घाई करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. सहकार्‍यांची मने जिंकून घ्याल. नवीन कल्पनांना वाव मिळेल. कामाच्या ठिकाणी आज तुमचे कौतुक होईल.

मिथुन:- आजचा दिवस मनाजोगा जाईल. आध्यात्मिक कामातून समाधान लाभेल. धार्मिक स्थळी मन रमेल. आज तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ देखील होण्याची संभावना आहे.

कर्क:- भावनेला आवर घालावी लागेल. अति विचार करत बसू नका. अनपेक्षित लाभाची शक्यता. योजेचेचे देखील पैसे मिळतील. तुमच्यावर आज शनिदेव प्रसन्न राहतील.

सिंह:- काही सकारात्मक बदल घडून येतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील कडवटपणा दूर होईल. आज जवळचा प्रवास योग आहे. (Today Horoscope 6 January 2025)

कन्या:- मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो.त्यामुळे मन अशांत राहील. इतरांवर फार विसंबून राहू नका. बुद्धीला योग्य मार्गाला लावावे. शक्यतो आज वाद टाळा.

तूळ:- आनंदाची अनुभूति मिळेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. वातावरण सकारात्मक राहील. शाळेतील मित्र-मैत्रिणी भेटतील. तुमचा आजचा दिवस आनंदी जाईल.

वृश्चिक:- कुटुंबासमवेत फिरायला जाल. दिवस आनंदात घालवाल. घरासाठी काही नवीन खरेदी करता येईल. नोकरीच्या नव्या संधी मिळतील.

धनू:- जोडीदाराच्या मदतीने कामे पूर्ण कराल.कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन ठरेल. मौज मस्ती कराल. आवडत्या जेवणाचा आस्वाद घ्याल. (Today Horoscope 6 January 2025)

मकर:- बोलण्यात गोडवा राखून कामे करून घ्याल. आळस झटकावा लागेल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. जोडीदारासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल.

कुंभ:- आज समाधानाला अधिक महत्त्व द्याल. ध्यान धारणेला प्राधान्य द्यावे. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. वाद टाळा. आज लांबचा प्रवास होऊ शकतो त्यामुळे वाहने सावकाश चालवा.

मीन:- नवीन भाषा शिकण्याची आवड निर्माण होईल. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत . आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल.

News Title : Today Horoscope 6 January 2025

महत्वाच्या बातम्या –

‘खासदाराची चड्डी सुद्धा…’; पोलीस अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटने पोलीस दलात खळबळ

“भिकाऱ्यांची संख्या वाढली, साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा”

धस सुसाट, मौनी दादांनाही मधे ओढलं, फडणवीसही दम देईनात, कारण काय?

घटस्फोट झाल्यास चहलच्या बायकोला ‘इतक्या’ कोटींची पोटगी मिळणार?

हिवाळ्यात डोकं नेमकं का दुखतं?, ‘या’ डोकेदुखीवर वापरा हे रामबाण उपाय

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .