आजपासून शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभ, देवी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी?

Today Horoscope 7 January 2025

Today Horoscope 7 January 2025 | आज 7 जानेवारीरोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी मंगळवारी संध्याकाळी 4 वाजून 27 मिनिटांपर्यंत राहील. तर आज 11 वाजून 16 मिनिटांपर्यंत शिवयोग जुळून येईल. तसेच आज राहू काळ 3 वाजता सुरु होईल ते 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय आज शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे. (Today Horoscope 7 January 2025 )

शाकंभरी नवरात्रोत्सव आठ दिवस साजरा केला जातो. ही नवरात्री प्रामुख्याने राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. यावेळी दुर्गा मातेच्या शाकंभरी अवताराची पूजा केली जाते. मातेचा हा अवतार पोषण आणि आरोग्याचे प्रतीक मानला जातो. तर, आज शाकंभरी देवी कोणाच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येणार ते पाहुयात.

आजचे राशीभविष्य-

तूळ:- तुमचे ज्ञान कामी येईल. संयम व विवेकाने वागावे. प्रेमी जीवनाला बहर येईल. सहकार्‍यांची मोलाची साथ लाभेल. आज तुम्हाला देवीच्या कृपेने अचानक धनलाभ देखील होण्याची संभावना आहे.

वृश्चिक:- घरात अधिक वेळ घालवाल. छान मनमोकळ्या गप्पा होतील. आज वाहन खरेदीचा योग आहे. आज तुम्हाला आवडीचे विवाहस्थळ येईल. तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी देखील प्रमोशन मिळेल.

धनू:- तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. शांततेने इतरांची समस्या समजून घ्याल. आजचा दिवस समाधानी जाईल. इतरांना मदत केल्यानंतर समाधान वाटेल. (Today Horoscope 7 January 2025 )

मकर:- तुमच्या आयुष्यात आज अचानक चांगल्या आणि आकर्षक व्यक्तीची एंट्री होईल. तुम्ही तुमच्या भविष्याच्या विचारात मग्न व्हाल.  गोड स्वप्न रंगवाल.  आवडते पदार्थ बनवाल. व्यापार्‍यांना अपेक्षित लाभ मिळेल.

कुंभ:- जोडीदार तुमच्यावर खुश होईल. तुमचे हट्ट पुरवले जातील. दिवस मनाजोगा घालवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. आज जवळचा प्रवास योग आहे. (Today Horoscope 7 January 2025 )

News Title : Today Horoscope 7 January 2025

महत्वाच्या बातम्या –

’20 मिनिटांत आणून सोडतो म्हणत 36 व्या काॅलनंतर…’; सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा!

मोठी बातमी! धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?

आता आरोपींची खैर नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT ला मिळाला महत्त्वाचा पुरावा

मुंडे-कराडांच्या जमिनी कुठे-कुठे? सुरेश धस यांनी केला धक्कादायक गौप्यस्फोट

संतोष देशमुखांच्या हत्येचं 3333 कनेक्शन, खळबळजनक माहिती समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .