आज तूळ, कुंभसह ‘या’ राशींना होणार धनलाभ; अश्विनी नक्षत्रात भाग्य उजळणार

Today Horoscope

Today Horoscope 8 January 2025 | आज 8 जानेवारीरोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. नवमी तिथी आज दुपारी 2 वाजून 26 मिनिटांपर्यंत राहील. आज रात्री 8 वाजून 23 मिनिटांपर्यंत सिद्ध योग राहील. तसेच अश्विनी नक्षत्र आज दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहील. अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती शिक्षण क्षेत्रात खूप यशस्वी होतात, असं म्हटले जाते. तर आजचा अश्विनी नक्षत्र कोणत्या राशीसाठी शुभ ठरणार ते पाहुयात (Today Horoscope 8 January 2025)

आजचे राशीभविष्य

मेष:- बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. नोकरीच्या नव्या संधी मिळतील.

वृषभ:- आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.आवडीची खरेदी कराल.

मिथुन:- कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. दिवसभर कामाची धांदल राहील.नवीन जबाबदारी मिळू शकते.

कर्क:- धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे आनंदी असाल.

सिंह:- जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. पोटाचे विकार संभवतात. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे. (Today Horoscope 8 January 2025)

कन्या:- जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संध्याकाळी एखादे सरप्राइज मिळेल. भागीदारीत चांगला नफा मिळेल.

तूळ:- इतरांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका.

वृश्चिक:- विद्यार्थ्यांना चांगला दिवस. आपले छंद जोपासावेत. तुम्हाला नवीन संधी मिळतील, त्याचा लाभ घ्या.

धनू:- कौटुंबिक जीवनात चांगले बदल होतील. घरातील ज्येष्ठांची सेवा करता येईल. आज वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल.

मकर:- तुम्हाला आज धनलाभ होऊ शकतो. योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल.

कुंभ:- लहान व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. आज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. जवळचा प्रवास योग आहे. दिवसाच्या शेवटी आनंदवार्ता मिळेल. (Today Horoscope 8 January 2025)

मीन:- आज लोक तुमच्या व्यक्तिमत्वावर आकर्षित होतील. विश्वासू मित्रांची साथ घ्यावी. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी देखील उत्तम दिवस जाईल.

News Title : Today Horoscope 8 January 2025

महत्वाच्या बातम्या –

संतोष देशमुख यांच्या मारहाणीच्या व्हिडीओमधून धक्कादायक माहिती समोर!

सरपंच हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी केली मोठी मागणी!

HMPV व्हायरसमुळे पुणे महापालिकेने घेतला मोठा निर्णय!

मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख यांचा मारहाणीचा व्हिडीओ CID च्या हाती???

संतोष देशमुखांच्या भावाने ‘ती’ महत्वाची याचिका घेतली मागे!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .