आजचे राशीभविष्य 8 मार्च 2025 : ‘या’ राशींवर असणार शनिदेवाची कृपा

Today Horoscope 8 March 2025

 Today Horoscope | आज 8 मार्च 2025 रोजी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे, जी सकाळी 8:17 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर दशमी तिथी सुरू होईल. आयुष्मान योग दुपारी 4:24 वाजेपर्यंत प्रभावी राहील, तर आर्द्रा नक्षत्र रात्री 11:29 वाजेपर्यंत प्रभावी असेल. या दिवशी राहू काळ सकाळी 9 ते 10:30 दरम्यान असेल. चला जाणून घेऊया, तुमच्या राशीसाठी हा शनिवार कसा राहील. ( Today Horoscope)

आजचे राशीभविष्य 

मेष:
प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठ व्यक्तींच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नाराजी पत्करावी लागू शकते. आज तुमच्या हातून एखादे चांगले कार्य घडेल. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी संयम आवश्यक आहे.

वृषभ:
कामात मन एकाग्र ठेवल्यास चांगले यश मिळेल. सामाजिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा आर्थिक ताण जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अकार्यक्षमतेमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. छुपे शत्रू तुमच्यावर नजर ठेवून असतील, त्यामुळे सावध राहा.

मिथुन:
स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा दिवस लाभदायक असेल. कुटुंबात पत्नीच्या इच्छेचा विचार करावा लागेल. वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्या. घरगुती प्रश्न शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा.

कर्क:
काही नातेवाईकांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्या लागतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वभावातील हट्टीपणा टाळावा, अन्यथा समस्या वाढू शकतात. स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

सिंह:
मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नुकसान होऊ शकते. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. काही ओळखीचे लोक मदतीसाठी पुढे येतील.

कन्या:
अतिरीक्त अपेक्षा ठेवू नका, अन्यथा निराशा होऊ शकते. कौटुंबिक वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा. आनंद शोधण्यासाठी मनःशांती महत्त्वाची आहे. जोडीदाराच्या निर्णयाचा आदर करा. आपल्या विचारसरणीत सकारात्मक बदल करावा. ( Today Horoscope)

तूळ:
छोट्या प्रवासात काही अडथळे येऊ शकतात. किरकोळ कारणांमुळे मनात निराशा येऊ शकते. कामाच्या जबाबदाऱ्या चोख पार पाडाल. अधिकारांचा योग्य वापर करा. मानसिक तणावाची शक्यता असल्याने संयम बाळगा.

वृश्चिक:
हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. शत्रूंच्या कारवायांपासून सावध राहा. बुद्धिमत्तेच्या जोरावर काही मोठे निर्णय घ्याल. धार्मिक कार्यासाठी वेळ काढाल. कौटुंबिक तणाव दूर करण्यासाठी संवाद साधा.

धनू:
प्रवासाचा अनुभव थोडा थकवणारा ठरू शकतो. मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी प्रयत्न करा. घरगुती सुखाला अधिक महत्त्व द्या. नातेवाईकांच्या अपेक्षांमध्ये अडकल्यास संघर्ष होऊ शकतो. बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा.

मकर:
अनावश्यक खर्च वाढू शकतो. प्रवास टाळणे हिताचे ठरेल. कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या कष्टावर यश मिळवाल. निर्णय घेताना तारतम्य बाळगा. प्रामाणिक राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कुंभ:
उदारपणे वागाल, पण गरजेपेक्षा जास्त खर्च टाळा. बोलण्यात अहंकार दर्शवू नका. नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने घशाचे विकार होण्याची शक्यता आहे. ( Today Horoscope)

मीन:
तुमच्या संयमाचा कस लागेल. आर्थिक दृष्टिकोनाने हा दिवस स्थिर राहील. अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वास्तवाशी जुळवून घ्या. आत्मविश्वासाने पुढे जा आणि मेहनतीला महत्त्व द्या.

Title : Today Horoscope 8 March 2025

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .