Today horoscope | आज 9 डिसेंबररोजी मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील दुर्गाअष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी सोमवारी सकाळी 8 वाजून 03 पर्यंत असेल, त्यानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल.आज दुपारी 1 वाजून 06 पर्यंत सिद्धी योग राहील.या आठवड्याचा पहिला दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाईल, ते पाहुयात. (Today horoscope)
आजचे राशीभविष्य
मेष:- काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार कराल.
वृषभ:- नवीन काम अंगावर येऊ शकते. विद्यार्थी वर्ग खुश असेल. दिवस आनंदी आणि प्रसन्न जाईल.
मिथुन:- कामात सकारात्मक बदल संभवतात. नियोजनबद्ध कामे करा.चंचलतेवर मात करावी लागेल. (Today horoscope)
कर्क:- ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल.
सिंह:- अपेक्षित उत्तर हाती येईल. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल. आज धनलाभ होण्याचे संकेत आहेत.
कन्या:- नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. सहकारी वर्ग मदत करेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तुमची बढती होण्याची शक्यता आहे.
तूळ:- दिवस संमिश्र राहील. हातातील काम यशस्वी होईल.आज जवळच्या व्यक्तीसोबत फिरायला जाल. (Today horoscope)
वृश्चिक:- एखादी नवीन संधी चालून येईल.एखादा वाद संपुष्टात येईल. कलेसाठी योग्य व्यासपीठ मिळेल.
धनू:- घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल. तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल.
मकर:- सोने खरेदी करण्याचा विचार कराल. विवाहस्थळासाठी होकार येईल. लग्नाचा योग जुळून येईल.
कुंभ:- आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल. तुम्हाला आज आर्थिक लाभ होईल.
मीन:- काही खर्च अचानक सामोरे येतील. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. (Today horoscope)
News Title – Today Horoscope 9 december 2024
महत्वाच्या बातम्या-
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नव्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!
मोठी बातमी! मागच्या सरकारमधील ‘या’ दोन मंत्र्यांचा पत्ता कट होणार?
‘त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये घेतले; माधुरीच्या गौप्यस्फोटाने सगळीकडे एकच चर्चा!
‘आम्हाला पण…’; रामदास आठवलेंच्या देवेंद्र फडणवीसांकडे मोठ्या मागण्या
‘या’ 25 वर्षीय अभिनेत्रीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू, नक्की काय घडलं?