आज नवरात्रीचा सातवा दिवस, देवी कालरात्री ‘या’ राशींना देणार सुख समृद्धी!

Today Horoscope | आज 9 ऑक्टोबररोजी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांपर्यंत राहील. त्याचप्रमाणे आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. नवरात्रीचा सातव्या दिवशी देवीच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाईल. दुर्गामातेचे सातवे रुप कालरात्रीची पूजा केल्याने रोगांचा नाश होतो, शत्रूंवर विजय प्राप्त होतो, भय दूर होते असे मानले जाते. आज कालरात्री देवीची कृपा कोणत्या राशीवर राहणार ते पाहुयात. (Today Horoscope)

आजचे राशीभविष्य

मेष : आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये.

वृषभ : घरात सुख-समृद्धी येईल. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तु खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल.

मिथुन : आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल.

कर्क : तुम्हाला आज शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. आजचा दिनक्रम व्यस्त राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका. (Today Horoscope)

सिंह : आज घरात धार्मिक कार्य घडेल. पूजा-पाठ मध्ये मन रमेल. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. धैर्याने परिस्थिती हाताळावी. (Today Horoscope)

कन्या : तुमच्या कष्टाला आज यश येईल.आज जवळचा प्रवास योग आहे. नवरात्रीत तुमच्या जीवनातील सर्व संकटे देवी दूर करेल. तुम्हाला धनलाभ देखील होण्याची दाट संभावना आहे. (Today Horoscope)

तूळ :  आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

वृश्चिक : तुमचे आज वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे मन शांत ठेवायचा प्रयत्न करा. आपले विचार लोकांसमोर मांडाल. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील. आजचा दिवस तणाव मध्ये जाऊ शकतो.

धनू : आज कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल. आज संपूर्ण दिवस प्रसन्न राहाल. तुमच्यासाठी आज आवडते विवाहस्थळ येऊ शकते. यामुळे मन आनंदी राहील.

मकर : खर्च करताना आवर घाला. अधिक पैसे खर्च होऊ शकतात. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.

कुंभ : व्यवसाय करणाऱ्यांचे अच्छे दिन येतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीसाठी कॉल येईल. आज प्रवास योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. (Today Horoscope)

मीन : नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. धार्मिक ठिकाणी भेट द्याल. यामुळे प्रसन्न राहाल.

News Title : Today Horoscope 9 October 2024 

महत्वाच्या बातम्या –

अजित पवारांना गुलीगत धोका; ‘हा’ बडा नेता साथ सोडणार

राज्यात खळबळ! ‘या’ माजी आमदारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राज्यात आचारसंहिता कधी लागणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, सर्व दौरे रद्द

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!