आधार, पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर आजच करा, अन्यथा होईल मोठं नुकसान
नवी दिल्ली | तुम्ही अजूनही तुमचं पॅन कार्ड (Pan Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) लिंक केलं नसेल तर आजच करून घ्या. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची 31 मार्च शेवटची तारीख आहे. उद्या 1 एप्रिलपासून हे अनिवार्य करण्यात आलं असून आजनंतर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.
31 मार्चनंतर तीन महिन्यांच्या आत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं तर 500 रूपये दंड भरावा लागणार आहे. तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड जून महिन्यापर्यंत लिंक केलं नाही तर त्यानंतर तुम्हाला 1000 रूपये दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आयकर ई फायलिंग वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या साईटवर Quick Link मधील Link Aadhaar हा पर्याय निवडावा लागेल. यात तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी (OTP) येईल. हा ओटीपी टाकला की तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक होईल.
दरम्यान, तुम्ही 31 मार्चनंतर देखील आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकता. मात्र, त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागेल. त्यामुळे तुम्ही अजूनही आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर आजच करून घ्या.
थोडक्यात बातम्या-
“संजय राऊतांनी कायमचं मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल”
झेलेन्सकी यांचा रशियाला गंभीर इशारा, म्हणाले…
दमदार फिचर्ससह Kiger कॉम्पॅक्ट SUV भारतात लाॅन्च; किंमत पण फारच कमी…
पुढील 3 ते 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट; ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी
आघाडीत बिघाडी???, आमदारांच्या नाराजीनंतर नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले…
Comments are closed.