Maharashtra Bandh | आज 24 ऑगस्टरोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून बंदचे आवाहन केले होते. मात्र, याला मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर म्हटलं आहे. तसेच, जे बंद करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे (Maharashtra Bandh)आदेशही कोर्टाने दिले आहेत.
यानंतर मविआने आपला बंद मागे घेतला. बंद मागे घेतला असला तरी महाविकास आघाडी आज राज्यभर काळ्या फिती लावत आंदोलन करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आज शनिवार 11 ते 12 या वेळेत मविआचे नेते, कार्यकर्ते हे तोंडाला काळी पट्टी लावून महिला, मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरुद्ध मूक निदर्शने करणार आहेत.
मविआकडून महाराष्ट्र बंद मागे
शरद पवार यांनी देखील हा बंद मागे घेण्यात यावा, असं आवाहन केलं. त्यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर 24 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा.उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते, असं ट्वीट शरद पवारांनी केलं आहे. (Maharashtra Bandh)
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 23, 2024
महाविकास आघाडी करणार मुकनिदर्शने
तर, उद्धव ठाकरे यांनी मी दोन तास आंदोलन करणार असल्याचं म्हटलंय. “मी तोंडाला काळी पट्टी बांधून शिवसेना भवनाजवळ बसणार आहे. माझं रक्षण करण्यासाठी कोणी येत नाही असं लोकांना वाटतं, तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. बांगलादेशात ते आपण पाहिलं. आपल्या देशात तशी परिस्थिती होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत. आमचं आंदोलन थांबणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. (Maharashtra Bandh)
News Title – today Maharashtra Bandh withdrawn
महत्त्वाच्या बातम्या-
आज श्रावणी शनिवार, महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींचं भाग्य उजळणार!
देवेंद्र फडणवीसांनी महिलांना दिली मोठी गुड न्यूज!
भाजपला मोठा धक्का बसणार; ‘या’ नेत्याने प्रोफाईलवरून हटवलं कमळ
मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा, मराठा आरक्षणानंतर आता…
तज्ज्ञांचा पालकांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला; मुलांना ‘या’ गोष्टी नक्की शिकवा