बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागरिकांनो सावधान! आज देखील महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, अलिकडे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. मात्र, कालच्या तुलनेत महाराष्ट्रात आज रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

आज महाराष्ट्रात 9 हजार 974 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 8 हजार 562 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 143 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 60 लाख 36 हजार 821 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 57 लाख 90 हजार 113 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 22 हजार 252 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. अशीच रुग्णसंख्या कमी होत राहिली तर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! ‘या’ राज्यात 6 जुलैपासून शिक्षण संस्था चालू होणार; वाचा काय आहेत गाईडलाईन्स

आजपासून ‘या’ जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन खुल्या बाजारात मिळणार

आजही सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दर स्थिर; वाचा ताजे दर

…..म्हणून लस घ्यायला गेलेल्या पत्नीचे आधार कार्ड घेऊन नवरोबा झाडावर जाऊन बसला

“राजकारणातील लोकांना अशी भीती दाखवल्यास लोकशाही संपुष्टात येईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More