येत्या काही तासांत ‘या’ जिल्ह्यांत दमदार पावसाचा इशारा; कुठे बरसणार मुसळधार पाऊस?

Rain Update l गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाने दडी मारल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला असल्याचे चित्र आहे. कारण पेरणीला सुरवात करताच पावसाचे प्रमाण कमी झाले आणि अचानकपणे कोसळणाऱ्या सरी कमी झाल्या आहेत. अशातच आता हवामान विभागाने पावसासंदर्भात एक महत्वाची अपडेट्स दिली आहे.

मुंबईत दमदार पाऊस पडण्याचा इशारा :

गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. कारण मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पावसाच्या काही भागात मुसळधार सरी कोसळल्या आहेत. आज पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात संततधार पाऊस कोसळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता हा पाऊस दिवसभर पडणार की काही तासांमध्ये पुन्हा गायब होणार, हे पाहाव लागणार आहे.

मात्र, पावसाच्या संततधार धारा सुरु असल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा खोळंबा देखील होऊ शकतो. सध्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि ढगांचा गडगडाट सुरु असल्याचं दिसत आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये मुंबईमध्ये दमदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Rain Update l राज्यातील शेतकऱ्यांना पावसाची ओढ :

राज्यात पावसाने आठवडाभरापासून विश्रांती दिल्याने तापमानात देखील वाढ होत आहे. मात्र पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त 5.69 टक्के पेरण्या झाल्या असून, पावसाने अल्पविश्रांती घेतल्याने शेतकरी पेरण्यांबाबत संभ्रमातपडल्याचं चित्र दिसत आहे. मात्र आता राज्यातील कृषी तज्ज्ञांकडून चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

वाशिम जिल्ह्यात अनेक भागात पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे वाशिममध्ये खरीप पेरणीला वेग आल्याच चित्र आहे. मात्र, कृषी विभागाने चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असे आवाहनकरूनही शेतकरीवर्ग पेरणी करण्यासाठी घाई करत असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 25 जूनपर्यंत मुंबईसह उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

News Title – Today Maharashtra Rain Update

महत्त्वाच्या बातम्या

आज या राशीचे व्यक्ती मोठा निर्णय घेतील! पण कोणासाठी?

‘संघर्षयोद्धा’ सिनेमात छगन भुजबळ-गुणरत्न सदावर्तेंची भूमिका कुणी साकारली?

कार्यकर्त्याने धुतले नाना पटोलेंचे पाय, नेमकं काय घडलं?

“अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे”; प्रविण तरडेंनी दिली गुड न्यूज

मोठी बातमी! ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची प्रकृती चिंताजनक