Maharashtra Rain l राज्यातील पावसाचा वेग हळूहळू वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक भागात पाऊस हजेरी लावत आहे. कधी मुसळधार पाऊस तर सोसाट्याचा वारा वाहत आहे. अशातच आता हवामान विभागाने पावसासंदर्भात एक महत्वाची अपडेट दिली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे टेन्शन वाढले आहे.
राज्यातील या भागांना अलर्ट जारी :
राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक व धारशिवसह कोकणात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत देखील पावसाचा जोर वाढला आहे. तसेच कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशातच आता हवामान विभागाने मुंबईला यलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, ठाणे या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज राज्यभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहावे.
Maharashtra Rain l पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी :
हवामान विभागाने मुंबईला यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय धुळे, नाशिक, नंदुरबार, परभणी, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे राज्यातील या जिल्ह्यांत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय हवामान विभागाने राज्यातील पुणे व साताऱ्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अहमदनगर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय रायगड व ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात देखील मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने राज्यातील बहुतांश ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. तसेच राज्यातील नागरिकांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
News Title : Today Maharashtra Rain Update
महत्त्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच झाला दहशतवादी हल्ला; काँग्रेसच्या बड्या नेत्याने साधला निशाणा
या राशीच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळावा
पहिल्याच टर्ममध्ये मुरलीधर मोहोळांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ!
पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने तरुणाची आत्महत्या; पंकजा मुंडे म्हणाल्या…