Maharashtra Rain l गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच आज मुंबई व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासह कोकणात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे.
या भागात आज जोरदार पावसाचा इशारा :
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज संपूर्ण विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. याशिवाय दक्षिण-पश्चिम मान्सून हे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात सक्रिय आहे.
तसेच मान्सूनमुळे कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. तसेच आज कोकण आणि गोवा जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
Maharashtra Rain l या भागात पडला जोरदार पाऊस :
महाराष्ट्रात 5 मे रोजी नांदेडमधील धर्माबाद येथे 3 मिमी, बिलोलीमध्ये 3, लोहा 2 आणि उमरी येथे 1 मिमी पाऊस झाला. तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे 3 मिलिलिटर, लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे 2 मिलिलिटर, अहमदपूर जिल्ह्यात 1 मिलिलिटर आणि धाराशिव जिल्ह्यात 1 मिलिलिटर पावसाची नोंद झाली आहे.
अशातच काल खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांशी संवादही साधला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खडकवासला धरणाला भेट देऊन जलाशयातील पाणी सोडण्याचा आढावा घेतला. तसेच पुण्यातील पुराबाबत त्यांनी बैठकही घेतली आहे. याशिवाय पुण्यात सध्या लष्कर, एनडीआरएफ आणि नागरी प्रशासनाची पथके तैनात करण्यात आली आहेत.
News Title : Today Maharashtra Rain Updates
महत्त्वाच्या बातम्या-
धाराशिवच्या हॉटेलमध्ये राडा; राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले
आवडीने चॉकलेट खाणाऱ्यांनो सावधान; रिसर्चमध्ये झाला धक्कादायक खुलासा
Diabetes असणाऱ्या रुग्णांनी ‘हे’ ड्राय फ्रूट्स खाऊ नये; अन्यथा..
रॉयल एनफिल्डला टक्कर देणार BSA ची नवी बाईक; पाहा फीचर्स
“माझ्या नादाला लागू नको, फडणवीसांचं राजकीय करीअर..”; जरांगेंनी भाजप नेत्याला झापलं