Weather News l राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवाल्याने नागरिकांचं चांगलच टेन्शन वाढलं आहे. पावसाने जून महिन्यात राज्यात सर्वच भागात हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. अशातच आता पावसाने विश्रांती घ्यावी अशी राज्यातील नागरिकांनी इच्छा बोलावून दाखवली आहे.
हवामान विभागाने वर्तवला महत्वपूर्ण अंदाज :
राज्यातील पावसासंदर्भांत हवामान विभागाने एक महत्वाची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ढगांची रचना आणि हवामानाची परिस्थिती पाहता वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत राज्याच्या किनारपट्टी व भागासह घाटमाथ्यावर सोमवारी देखील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
अशातच आता प्रामुख्याने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात देखील मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यावर पावसाचे संकट कायम आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
Weather News l पावसाचा जोर का वाढतोय? :
पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कारण झारखंड राज्याच्या उत्तरेला अति तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे ईशान्य मध्य प्रदेशावर पावसाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे येत्या 12 तासांमध्ये या प्रक्रियेला आणखी तीव्रता प्राप्त होणार आहे.
याशिवाय समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा हा गुजरात राज्यापासून केरळच्या किनारपट्टीवर सक्रिय होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे पुढील 24 तासांमध्ये महापराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रासह घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढणार आहे. यामध्ये पुणे आणि सातारा हा दोन जिल्ह्यांवर सर्वाधिक प्रभावित क्षेत्र राहणार आहे. त्यामुळे या दोन डोळ्यांमध्ये येत्या 12 तासांमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
News Title : Today Maharashtra Weather News
महत्त्वाच्या बातम्या-
12 पैकी ‘या’ 2 राशींवर महादेवाची कृपा राहणार
“नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नयेत, नाहीतर..”; जरांगे पाटील यांचा थेट इशारा
राज्यातील 20 धरणे तुडुंब भरली; ‘या’ गावांना सावधानतेचा इशारा
रोज सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे!
पुणेकरांनो सतर्क राहा! पावसाचा जोर वाढला, खडकवासलातून पाण्याचा ‘विसर्ग’ वाढवणार