धो-धो पाऊस कोसळणार; राज्यातील या जिल्ह्यांना रेड व यलो अलर्ट जारी

Weather Update l राज्यात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यात पाऊस कोसळू लागला असला तरी देखील पावसाचा जोर हळूहळू वाढत चालला आहे. अशातच हवामान विभाग दरोरज हवामानासंदर्भात नवनवीन अपडेट्स जारी करत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा राज्यात पुढील चार दिवस पावसाची दाट शक्यता कायम असल्याचे सांगितले आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी :

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागात पुढील चार दिवस दाट पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यासह कोकणात पुढील 4 दिवस पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याने ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील रत्नागिरी, सोलापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आयएमडीने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच आज व पुढील चार दिवस राज्यभरात पावसाचा अंदाज कायम असणार आहे.

Weather Update l विदर्भ व मराठवाडयात जोरदार पावसाचा अंदाज :

विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुफान वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट दिला आहे.

याशिवाय राज्यातील नागरिकांनी योग्य ती दक्षता घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाने केलं आहे. राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

News Title : Today Maharashtra Weather Update

महत्त्वाच्या बातम्या- 

या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ होणार

मोठी बातमी! मुरलीधर मोहोळांना मिळालं ‘हे’ महत्त्वाचं खातं

नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ जाहीर, कुणाला कुठलं खातं?, वाचा एका क्लिकवर

“मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही”, मुरलीधर मोहोळांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

“…तर शिवसेना एकत्र येईल”, शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य