Weather Update l राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दररोज राज्यातील विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. कुठं मुसळधार पाऊस तर कुठं मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र असं असतानाही राज्यातील काही भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. मात्र आता हवामान विभागाने एक मथवपूर्ण माहिती दिली आहे. आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस? :
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात यलो अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे. तसेच आज कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील ज्या भागात अलर्ट जारी केला आहे त्या भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. तर दुसरीकडं सिंधुदुर्गसह, मुंबई सातारासह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Weather Update l पावसाने राज्यातील काही भागात पावसाची दडी :
राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस कमी पडला आहे. याशिवाय या भागातील शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पेरण्या देखील केल्या आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र कमी प्रमाणात पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांवर दुभार पेरणीचे संकट देखील ओढवण्याची शक्यता आहे.
याशिवाय हवामान विभागाने राज्यातील काही भागात चांगला पाऊस झाला असल्याने त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची कामे देखील उरकली आहेत. मात्र, ज्या ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस झाला आहे, त्याठिकाणचे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच आता उद्या राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची दाट शक्यता आहे.
News Title – Today Maharashtra Weather Update
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यातील ‘या’ भागात घडली धक्कादायक घटना! 14 वर्षांच्या मुलानं अनेकांना टँकरनं उडवलं
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल; ‘या’ दिवसापासून द्यावे लागणार जास्त पैसे
1 जुलैनंतर सिम पोर्ट करणे होणार अत्यंत अवघड, अन्यथा बसू शकतो लाखोंचा दंड
या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात यश मिळणार
Diabetes रुग्णांसाठी जांभूळ एक वरदानच; जाणून घ्या याचे फायदे