आज राज्यात कसं असणार हवामान? ‘या’ भागाला यलो अलर्ट

Weather Update l गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पनवेल परिसरात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. अशातच आता राज्यातील काही भागात यलो अलर्ट जारी केला आहे.

‘या’ भागात आज पावसाचा यलो अलर्ट जारी :

राज्यातील अनेक ठिकाणी थेट घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. तर रेल्वेच्या सेवेवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. या वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक गाड्या देखील रद्द झाल्या आहेत. दरम्यान, आज देखील हवामान विभागाने (IMD) राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय राज्यातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील इतर भागात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

Weather Update l नागरिकांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी :

वाढत्या पावसामुळे मुंबईसह परिसरात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा व संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे.

मुंबई व उपनगरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच पहाटे पावसाचा जोर देखील वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मुंबई उपनगरातील हिंदामाता परिसर, दादर, अंधेरी, कुर्ला, माटुंगा, भांडूप परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.

News Title : Today Maharashtra Weather Update

महत्वाच्या बातम्या-

या राशीच्या व्यक्तींनी नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्यावी

पावसाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ भागातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

दुःखद! ऑस्कर विजेत्यानं घेतला जगाचा निरोप

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे! ‘या’ भागांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

पावसाळ्यात सर्दी-खोकल्यापासून त्रस्त आहात?, ‘हे’ आयुर्वेदिक उपाय देतील आराम