गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाला आहे. अशातच आता पुढील 24 तासात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज पाऊस नेमक्या कोणत्या भागात धुमाकूळ घालणार जाणून घेऊयात…
Weather Update l राज्यातील नागरिकांनी सतर्क राहावे :
हवामान खात्याच्या माहितीनुसार आज रायगड, रत्नागिरी व पालघर जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील 4 दिवस राज्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील भागांमध्ये देखील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानंकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्याच्या बहुतांश भागांमधून पावसाने गैरहजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र अशातच आता हा पाऊस पुन्हा एकदा राज्यभर जोर धरताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील जलप्रवाह दुप्पट ताकदीनं वाहणार आहेत. पुढील चार दिवसांसाठी पावसाचा जोर जास्त प्रमाणात राहणार आहे, तर काही जिल्हे मात्र यास अपवाद देखील असणार आहेत. मात्र पावसाच्या वाढत्या जोरामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.
Weather Update l कोणत्या भागासाठी कोणता अलर्ट जारी? :
नाशिक -ऑरेंज अलर्ट
नंदूरबार – ऑरेंज अलर्ट
मुंबई – यलो अलर्ट
पुणे – ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर -ऑरेंज अलर्ट
सातारा -ऑरेंजअलर्ट
ठाणे – ऑरेंज अलर्ट
रायगड – ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी – ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग – ऑरेंज अलर्ट
काल नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे त्या अतिमुसळधार पावसानंतर नाशिकमध्ये गोदावरी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता गोदावरी नदीच्या पातळीत देखील वाढ झाली आहे.
News Title – Today Maharashtra Weather Update
महत्त्वाच्या बातम्या-
आज कृष्ण जन्माष्टमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
पुणेकरांनो सतर्क राहा! आज अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी
कॉँग्रेसचा निष्ठावंत नेता हरपला! नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन
अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या डोक्याला ताप, महायुतीच्या 2 आजी-माजी आमदारांमध्ये कलह
युवकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सिनेमातून भाष्य, श्रीयुत नॅान महाराष्ट्रीयन प्रेक्षकांच्या भेटीला